Vitamin D Fights Corona Infection : 'Vitamin D' घेतल्याने गंभीर कोरोना संसर्गाचा धोका कमी होतो - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 11:03 AM2021-09-18T11:03:31+5:302021-09-18T11:06:04+5:30

Vitamin D Fights Corona Infection : कोरोना व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी नवीन स्टडीनुसार, व्हायरसच्या गंभीर संसर्गापासून बचाव करण्यासाठी व्हिटॅमिन डी ची महत्त्वाची भूमिका असल्याचे आढळले आहे.

taking vitamin d reduces the risk of serious corona infection research | Vitamin D Fights Corona Infection : 'Vitamin D' घेतल्याने गंभीर कोरोना संसर्गाचा धोका कमी होतो - रिसर्च

Vitamin D Fights Corona Infection : 'Vitamin D' घेतल्याने गंभीर कोरोना संसर्गाचा धोका कमी होतो - रिसर्च

Next

Vitamin D Fights Corona Infection : कोरोनाच्या काळात शरीराला निरोगी ठेवणे ही पहिली गोष्ट आहे आणि जर तुम्हाला दीर्घकाळापर्यंत आजारांपासून दूर राहायचे असेल तर यासाठी तुम्हाला इतर आवश्यक जीवनसत्वे आणि पोषक तत्त्वांप्रमाणे व्हिटॅमिन डीचा (Vitamin D) आपल्या आहारात समावेश करणे आवश्यक आहे. सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा सर्वात मोठा नैसर्गिक स्रोत आहे. त्यामुळे हाडे, स्नायू आणि दात निरोगी आणि मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन डीची आवश्यकता असते. एवढेच नाही तर व्हिटॅमिन डी आपल्या शरीरातील हाडांपर्यंत कॅल्शियम पोहोचवण्याचे काम करते. (taking vitamin d reduces the risk of serious corona infection research)

दैनिक जागरणमध्ये प्रकाशित झालेल्या स्टडीनुसार, व्हिटॅमिन डी तुम्हाला कोरोनाच्या गंभीर संसर्गापासून वाचवू शकते. कोरोना व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी नवीन स्टडीनुसार, व्हायरसच्या गंभीर संसर्गापासून बचाव करण्यासाठी व्हिटॅमिन डी ची महत्त्वाची भूमिका असल्याचे आढळले आहे. स्टडीनुसार, शरीरात व्हिटॅमिन डीचे पुरेसे प्रमाण असणे केवळ संसर्ग गंभीर होण्यापासून रोखू शकत नाही, तर मृत्यूचा धोका देखील टाळू शकते. आंतरराष्ट्रीय अभ्यासाच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

स्टडीचा निकाल...
ही स्टडी आयर्लंडमधील ट्रिनिटी कॉलेज (Trinity College), स्कॉटलंडमधील एडिनबर्ग युनिव्हर्सिटी (Edinburgh University) आणि चीनमधील झेजियांग युनिव्हर्सिटी (zhejiang university)यांच्या रिसर्चर्सच्या एका ग्रुपकडून करण्यात आली आहे. स्टडीचे निकाल जर्नल सायंटिफिक रिपोर्ट्समध्ये प्रकाशित झाले आहेत. स्टडीमध्ये व्हिटॅमिन डीच्या अनेक स्तरांवर रिसर्च करण्यात आला. ज्याच्या आधारे रिसर्च करणाऱ्यांनी की व्हिटॅमिन डी गंभीर रोग आणि कोरोनाच्या मृत्यूपासून संरक्षण करू शकते. 


व्हिटॅमिन डी सप्लिमेंट सुरक्षित
झेजियांग युनिव्हर्सिटीचे संशोधक झू ली म्हणाले, 'आमची स्टडी व्हिटॅमिन डी सप्लिमेंट वापराच्या समर्थनासाठी आहे. त्याचा वापर केवळ हाडे आणि स्नायूंचे आरोग्य राखू शकत नाही तर कोरोनापासून संरक्षण देखील देऊ शकतो'. तर या स्टडीसंबंधित ट्रिनिटी कॉलेजच्या प्राध्यापक लीना जगागा म्हणाल्या, 'कोरोना चाचणीमध्ये व्हिटॅमिन डी सप्लिमेंटला सुरक्षित असल्याचे आढळले आहे. ही प्रतिबंधाची आर्थिक पद्धत असू शकते.'  यापूर्वीच्या स्टडीमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आणि कोरोना यांच्यातील संबंधाची बाब आधीच समोर आली आहे.

व्हिटॅमिन डी कसे पुरवले जाऊ शकते?
हेल्थलाईनच्या मते, जेव्हा आपण सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असतो, तेव्हा शरीर स्वतःच व्हिटॅमिन डी तयार करते. हेच कारण आहे की या व्हिटॅमिनला सनशाईन व्हिटॅमिन असेही म्हणतात. मात्र, असे काही पदार्थ आहेत ज्यात व्हिटॅमिन डी असते. उदाहरणार्थ, सॅल्मन, लिव्हर ऑइल, ट्यूना, अंड्यातील पिवळ बलक, मशरूम, गाईचे दूध, सोयाबीनचे दूध, संत्र्याचा रस, ओटमील इत्यादींचे सेवन करून शरीरात व्हिटॅमिन डी पुरवले जाऊ शकते. या व्यतिरिक्त, तुम्ही व्हिटॅमिन डी असलेले सप्लिमेंट इत्यादी देखील घेऊ शकता.

Web Title: taking vitamin d reduces the risk of serious corona infection research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app