मुलांची विशेष काळजी घ्या (बातमी जोड व बॉक्स)
By Admin | Updated: February 21, 2015 00:50 IST2015-02-21T00:50:04+5:302015-02-21T00:50:04+5:30
-स्वाईन फ्लू विषयी मुलांना माहिती द्या

मुलांची विशेष काळजी घ्या (बातमी जोड व बॉक्स)
-स ्वाईन फ्लू विषयी मुलांना माहिती द्याडॉ. पाटील म्हणाले, लहान मुलांना संसर्ग कसा होतो, कोणत्या कारणांमुळे होतो याची माहिती नसते. यामुळे या मुलांना शाळेतून आणि घरातून याविषयीची माहिती देणे गरजेचे आहे. लहान मुलांचा स्वाईन फ्लूपासून बचाव करण्यासाठी त्यांना गर्दीच्या ठिकाणी पाठवू नये. तीन ते चार दिवसांपेक्षा अधिक काळ आजारी असल्यास त्यांना बालरोगतज्ज्ञाकडे न्या. लहान मुलांना बाहेरून आल्यावर, खाण्याचा आधी आणि शक्य असल्यास दर दोन तासांनी स्वच्छ हात धुवायला सांगा. यामुळे संसर्ग होण्याचा धोका खूप कमी होईल. लहान मुलांना श्वास घेण्यास त्रास होत असेल तर घरगुती उपचार करू नका, त्यांना डॉक्टरांकडे लगेच घेऊन जा, असेही ते म्हणाले. -वातावरणातील बदल स्वाईन फ्लूसाठी पोषकडॉ. चरडे म्हणाले, शुक्रवारी दुपारी आलेल्या पावसांमुळे वातावरणात बदल झाला आहे. स्वाईन फ्लूसाठी हे वातावरण पोषक ठरू शकते. यामुळे व्यापक प्रमाणात प्रतिबंधक उपाययोजना आवश्यक आहेत. विशेषत: मोठ्यांनी खोकलताना, शिंकताना रुमालाचा वापर केल्यास काही प्रमाणात यावर प्रतिबंध येऊ शकतो. विद्यार्थ्यांमध्ये स्वाईन फ्लूसदृश लक्षणे आढल्यास शिक्षकांनी त्वरित वैद्यकीय विभागास कळवावे. पालकांना या विषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांना घरी राहण्याचा सल्ला देऊन आवश्यक वैद्यकीय उपचार घ्यावेत. बॉक्स...::हे करा...-हात सातत्याने साबण व पाण्याने धुवा-गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा-खोकताना व शिंकताना तोंडाला रुमाल लावा-भरपूर पाणी प्या-पुरेशी झोप घ्या-पौष्टिक आहार घ्या