'ही' आहेत कानाच्या कॅन्सरची लक्षणं; चुकूनही करू नका दुर्लक्ष!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 02:25 PM2018-10-23T14:25:26+5:302018-10-23T14:27:06+5:30

सध्या बदलत वातावरण आणि बदललेली जीवनशैली यांमुळे अनेक आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. अनेक लोकांमध्ये हल्ली कॅन्सरचे वाढतं प्रमाण दिसून येत आहे.

symptoms of rare ear cancer | 'ही' आहेत कानाच्या कॅन्सरची लक्षणं; चुकूनही करू नका दुर्लक्ष!

'ही' आहेत कानाच्या कॅन्सरची लक्षणं; चुकूनही करू नका दुर्लक्ष!

googlenewsNext

सध्या बदलत वातावरण आणि बदललेली जीवनशैली यांमुळे अनेक आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. अनेक लोकांमध्ये हल्ली कॅन्सरचे वाढतं प्रमाण दिसून येत आहे. कन्सर अनेक प्रकारचा आढळतो. परंतु कधी कानांच्या कॅन्सरबाबत ऐकलं आहेत का? याबाबत फार क्वचित ऐकायला मिळतं परंतु याकडे दुर्लक्ष करणं फार महागात पडू शकतं. कानामध्ये होणारा कॅन्सर एका ट्यूमरच्या रूपात कानाच्या आतमध्ये किंवा बाहेरही होऊ शकतो. या कॅन्सरच्या पेशींना वैद्यकिय भाषेमध्ये स्कावमस सेल कार्सीनोमाच्या नावाने ओळखले जाते. या कॅन्सरच्या पेशी हळूहळू संपूर्ण शरीरामध्ये पसरतात. कोणत्याही प्रकारचा कॅन्सर होण्याआधी काही शारीरिक लक्षणं दिसून येतात परंतु बऱ्याचदा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. जाणून घेऊया कानाच्या कॅन्सरच्या सुरुवातीच्या लक्षणांबाबत...

कानातून पाणी किंवा रक्त येणं

कानातून पाणी किंवा रक्त येतं असल्यास दुर्लक्ष करू नका. त्वरीत डॉक्टरांकडून सल्ला घ्या. हे कॅन्सरच्या सर्वात मोठ्या लक्षणांपैकी सर्वात महत्त्वाचे लक्षण आहे. 

कानाचं इन्फेक्शन 

जर कान दुखत असेल किंवा कानामध्ये इन्फेक्शन झालं असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. ही एक गंभीर समस्या असून यामुळे कॅन्सर होण्याचा धोका संभवतो. 

कान बंद होणं

अनेकदा असं होतं की, कानामध्ये पाणी गेल्याने कान बंद होतो. तसेच कोणत्यातरी कारणाने ऐकू येणं बंद होतं. यावर योग्य वेळी उपचार करणं फायदेशीर ठरतं. 

कानामध्ये खाज येणं

कानामध्ये साचलेल्या मळामुळे अनेकदा कानामध्ये खाज येते. परंतु जर कानामध्ये जास्त दिवस खाज येत असल्यास डॉक्टरांकडून तपासून घेणं फायदेशीर ठरतं. 

कानात सतत वेदना होणं

तोडं उघडताना किंवा काही खाताना कानामध्ये प्रचंड वेदना होत असतील तर कानाच्या कॅन्सरचा धोका असू शकतो. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका. 

ऐकू न येणं

जर एखाद्या व्यक्तीला ऐकू येणं पूर्णपणे बंद झालं तर हे कानाच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. अशा प्रकरणांमध्ये रूग्णांना नेहमी कानामध्ये वेदनांसोबतच डोकदुखी आणि चक्कर येण्यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर कानातून रक्त येणं, कानामध्ये अल्सर होण यांसारख्या समस्याही होतात. 

कानाच्या पडद्याला टिबी

जेव्हा कानाच्या पडद्याला टिबी झाल्यास कानामधून पिवळ्या किंवा पांधऱ्या रंगाचं द्रव्य बाहेर येतं. याचा अर्थ असा होतो की, रूग्णाच्या कानाचा पर्दा फाटलेला आहे. याचं मुख्य कारण म्हणजे  फार मोठ्या प्रमाणावर आवाज कानवर पडणं, कानामध्ये एखाद्या गोष्टीचा आघात होणं किंवा जखम होणं इत्यादी. 

Web Title: symptoms of rare ear cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.