शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

'ही' लक्षणे दिसली तर समजा तुमची पचनक्रिया झालीय खराब!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 10:18 IST

अपचन, गॅस, उलटी, पोटदुखी, पोटात सूज या समस्या होतात. पचनक्रिया बिघडली की, वेगवेगळ्या आजारांचा तुम्हाला सामना करावा लागतो.

(Image Credit : Cabot Health)

सतत काही चुकीचं खात राहिल्याने पचन तंत्रावर वाईट प्रभाव पडतो. पचनक्रिया अन्न ऊर्जेत बदलून शरीराला आजारांशी लढण्याची शक्ती देते. पचनक्रिया व्यवस्थित न झाल्यास अन्न पचन होत नाही. त्यामुळे अपचन, गॅस, उलटी, पोटदुखी, पोटात सूज या समस्या होतात. पचनक्रिया बिघडली की, वेगवेगळ्या आजारांचा तुम्हाला सामना करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला तुमची पचनक्रिया खराब झाल्यावर काय संकेत दिसतात हे सांगणार आहोत. जेणेकरून त्यात तुम्ही वेळीच सुधारणा करू शकाल.

शरीर आणि श्वासांची दुर्गंधी

जेव्हा शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडत नाहीत, तेव्हा शरीरातून दुर्गंधी येऊ लागते. अधिक घाम, पायांची दुर्गंधी हे पचनक्रिया खराब असण्याचे संकेत आहेत. शरीरातून न निघणारे विषारी पदार्थ रक्तप्रवाहात जाऊन त्वचेमध्ये अडकून राहतात. ज्यामुळे शरीराची दुर्गंधी येऊ शकते. अशात शरीरातून  डीटॉक्स दूर करणाऱ्या पदार्थाचं सेवन करायला हवं. अनेकदा श्वासांची दुर्गंधी येणे हा सुद्धा पचनक्रिया खराब असण्याचा संकेत आहे. दोन-तीनदा ब्रश करूनही श्वासांची दुर्गंधी जात नसेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

त्वचेची समस्या

(Image Credit : Reports Healthcare)

जास्त दिवस पोट खराब राहणे किंवा पोट साफ न होणे ही पचनक्रियेची समस्या आहे. जेव्हा असं होतं तेव्हा त्वचेचं नुकसान होतं. अशावेळी पिंपल्स, सोरायसिस किंवा एक्जिमाची समस्या होऊ शकते. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

केसगळती अधिक होणे

पचनक्रिया खराब झाल्याने केसगळीतही अधिक होते. खराब डायजेशनमुळे केस कमजोर होता. पचनक्रिया खराब असल्याने अन्नातील योग्य पोषण केसांपर्यंत पोहोचत नाही, ज्यामुळे केसगळती, केस पांढरे होणे आणि केस पातळ होणे या समस्या होऊ लागतात.

कमजोर नखे

(Image Credit : Well Within You)

पचनक्रिया फार जास्त काळासाठी खराब राहिली तर याचा प्रभाव शरीरासह नखांवरही बघायला मिळतो. जेव्हा पचन तंत्र खराब असतं तेव्हा शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघू शकत नाहीत. ज्यामुळे वेगवेगळ्या समस्या होतात. यात नखे तुटणे किंवा नखे कमजोर होणे यांचाही समावेश आहे.

पचनक्रिया दुरूस्त करण्याचे उपाय

(Image Credit : Daily Collect)

पचनक्रिया चांगली आणि मजबूत ठेवण्यासाठी हेल्दी आणि पौष्टिक पदार्थांचं सेवन करावं. जास्तीत जास्त फायबर युक्त पदार्थांचा डाएटमध्ये समावेश करावा, जेणेकरून पोट साफ राहील. जेवण चांगलं चावून खावं. घाईघाईने काही खाल तर ते व्यवस्थित पचणार नाही. त्यासोबतच पचनक्रिया चांगली ठेवण्यसाठी नियमित एक्सरसाइज करणेही गरजेचे आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य