शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पोटात खालच्या बाजूला दुखणं पडू शकतं महागात, ऑपरेशनची वेळ येण्याआधीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 10:17 IST

अनेकदा पोटदुखीच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्यामुळे मोठ्या आजारांचा धोका असू शकतो.

पोटात दुखण्याची समस्या अनेकांना जाणवत असते. अनियमीत खाण्याच्या वेळा, जंक फुड, तेलकट आणि मैद्याचे अन्नपदार्थ जास्त प्रमाणात खाल्याने पोटाच्या समस्या उद्भवतात.  एसिडिटी, पोट साफ न होणं, अजीर्ण, गॅस होणं, यामुळे पोटात दुखण्याची समस्या निर्माण होते. पण अनेकदा पोटदुखीच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्यामुळे मोठ्या आजारांचा धोका असू शकतो.अपेडिक्सची लक्षणं पोटातूनच दिसायला सुरूवात होते.वेळेवर उपचार केले नाही तर जीवघेणं ठरू शकतं. जर तुम्हाला या जीव घेण्या आजारापासून वाचायचं असेल तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला अपेडिक्सच्या समस्येची लक्षणं सांगणार आहोत.

काय आहे अपेडिक्स

अपेंडिक्स आपल्या आतड्यांचा एक छोटासा भाग असतो. हा एका पातळ आणि छोट्या ट्यूबसारखा असतो. याची लांबी २ ते ३ इंच असते. अपेंडिक्सला दोन तोंड असतात. एक बंद असतं तर दुसरं उघडं असतं. जर या उघड्या तोंडातून अन्न अपेंडिक्समध्ये गेलं तर ते बाहेर येऊ शकत नाही. ज्यामुळे अंपेडिक्समध्ये इन्फेक्शन होऊ लागतं आणि पोटात वेदना होऊ लागतात.  

अपेंडिक्सवर सूज येण्याची दोन कारणे असू शकतात. एक इन्फेक्शन आणि दुसरं म्हणजे अपेंडिक्समध्ये काही फसल्यानेही होते. तसेच डाएटमध्ये फायबरयुक्त पदार्थांची कमतरता हेही एक मुख्य कारण असू शकतं. आतड्यांच्या कॅन्सरमुळेही अपेंडिक्सची समस्या होऊ शकते. ही समस्या कोणत्याही वयात होऊ शकते, पण १० ते ३० या वयात ही समस्या होण्याची शक्यता अधिक असते.

लक्षणं

सतत गॅस होणं

अनेकांना गॅसची समस्या सतत जाणवत असते. बटाटा, वाटाणे, ब्रेड, असे पदार्थ सतत खाण्यात आल्यामुळे गॅसची समस्या उद्भवते.  तुम्हाला पोटात गॅस तयार होण्यासोबतच पोटात सतत दुखत असेल आणि गॅस पास झाल्यावरही तुम्हाला आराम वाटत नसेल तर हे अपेंडिक्सतं लक्षण असू शकतं.  

पोट साफ न होणं, लूज मोशन

 तुमचं पोट साफ नसेल, तर कधी लूज मोशन होत असेल किंवा कधी डायरिया होत असेल हे सुद्धा अपेंडिक्सचं लक्षण असू शकतं. वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये अपेडिंक्सची वेगवेगळी लक्षणे बघायला मिळू शकतात. अशी समस्या उद्भवत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. ( हे पण वाचा- लॉकडाऊनमध्ये घरात बसून झोप येत नाहीये? चांगल्या झोपेसाठी वापरा 'या' टिप्स....)

हालचाल करणं कठीण होतं

अपेंडिक्समुळे पोटात होणाऱ्या वेदना या थोडा वेळ बेडवर झोपल्याने किंवा शांतपणे बसून राहिल्याने दूर होते असं नाही. या वेदना सतत होत राहतात आणि कशाप्रकारची शारीरिक हालचाल केली तर वेदना अधिक वाढतात. अनेकदा खोकला आल्यावर आणि शिंकल्यावरही पोटात जोरदार वेदना होतात. ( हे पण वाचा-आधीच कोरोनामुळे लॉकडाऊन; घरी बसून लोक होत आहेत 'या' गंभीर आजारांचे शिकार)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य