स्वप्नील आणि सुबोध पहिल्यांदा एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 02:22 IST
पहिल्यांदा स्वप्नील जोशी व सुबोध भावे अशी हटके जोडी २०१६ मध्ये सरप्राईज पॅकेज घेउन येत असल्याचे अभिनेता सुबोध भावे याने लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले.
स्वप्नील आणि सुबोध पहिल्यांदा एकत्र
बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये सलमान आणि शाहरूख या स्टार जोडींना एकत्रित पाहण्यासाठी सर्वच प्रेक्षक उत्साही असतात. त्याचप्रमाणे मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील दोन स्टार मराठी कलाकारांना एकत्र पाहण्याासाठी प्रेक्षक वाट पाहत आहे. याच रसिक मायबापांची इच्छा पूर्ण करण्यासाठी पहिल्यांदा स्वप्नील जोशी व सुबोध भावे अशी हटके जोडी २०१६ मध्ये सरप्राईज पॅकेज घेउन येत असल्याचे अभिनेता सुबोध भावे याने लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले. सुबोध म्हणाला, स्वप्नील आणि मी 'फुगे' या मराठी चित्रपटातून पहिल्यांदा एकत्रित येत आहोत. त्यामुळे खूप दिवसांची इच्छा पूर्ण होत आहे. खास एकत्रित येण्यासाठी या चित्रपटाची कथा देखील आम्ही दोघांनी स्वत: लिहीली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वप्ना जोशी करणार असून निर्र्माते गिरीश मोहिते आहेत. चला, तर मराठी इंडस्ट्रीच्या नवीन व या हटके जोडीला या चित्रपटासाठी शुभेच्छा देउयात.