सुव्रत आणि सखी क्रेझी डान्स पार्टनर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2016 12:51 IST2016-03-19T19:51:33+5:302016-03-19T12:51:33+5:30
सुव्रत म्हणाला,सखीला आणि मला डान्स करायला फार आवडतो. आम्ही एकमेकांचे क्रेझी डान्स पार्टनर आहोत.

सुव्रत आणि सखी क्रेझी डान्स पार्टनर
द ल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून तरूणांची धडकन बनलेले सुयश, रेश्मा म्हणजेच सुव्रत जोशी आणि सखी गोखले हे दोघे रील लाइफमधल्या मस्तीप्रमाणेच रियल लाइफमध्येदेखील खूप धमाल करत असल्याचे सुव्रत जोशी यांनी लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले. सुव्रत म्हणाला,सखीला आणि मला डान्स करायला फार आवडतो. आम्ही एकमेकांचे क्रेझी डान्स पार्टनर आहोत. आम्ही दोघे ही अक्षरश: वेडयासारखे डान्स करत असतो. आम्हाला बॉलीवुडच्या नायन्टींजच्या चिचोडया गाण्यांवर नाचायला खूप मजा येते. कोणत्याही पार्टीमध्ये गेल्यावर आम्ही स्पेशल डीजेला रिक्वेस्ट करतो की, गोविंदा आणि सुनिल शेट्टीची गाणी लावा. किसी डीस्को में जाये, हाय रूख हाय रूख हाय ही आमच्या डान्सची फेव्हरेट गाणी आहेत. असो, रेश्मा आणि सुयशचा हा डान्सचा क्रेझीपणा पाहून तरूणांनादेखील आश्चर्य वाटले असणार हे नक्की.