शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
4
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
5
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
6
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
7
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
8
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
9
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
10
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
11
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
12
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
13
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
14
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
15
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
16
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
17
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
18
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
19
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
20
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...

अचानक Heart Attack आल्यावर कराल हे काम तर वाचू शकतो जीव, लक्षणेही वेळीच ओळखा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 13:17 IST

Sudden Heart attack reason : हृदय आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव असतो. याचं काम पूर्ण शरीरात ऑक्सिजन आणि रक्त पुरवठा करणं आहे. एकप्रकारे हृदय आपल्या शरीरातील इतर अवयव जिवंत ठेवण्याचं काम करतं.

Sudden Heart attack reason : जम्मू-काश्मीरमध्ये एक कलाकार स्टेजवर परफॉर्म करताना हार्ट अटॅक येऊन मृत्यू पावला. ही घटना बिश्नाह भागात जागरणादरम्यान घडली. कार्यक्रमादरम्यान स्टेजवर शिव आणि पार्वतीची स्टोरी सुरू होती. पार्वतीच्या वेषात एक 20 वर्षीय तरूण डान्स करत होता. पण अचानक डान्स करता करता तरूण स्टेजवर पडला आणि बेशुद्ध झाला. लोकांना वाटलं की, हा परफॉर्मन्सचा भाग आहे. बराच वेळ तो उठला नाही तेव्हा शिवाची भूमिका करत असलेली व्यक्ती त्याच्याजवळ गेली आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. लोक त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशच्या गणेश चतुर्थी दरम्यान एका कलाकाराचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. गेल्या काही काळापासून अशा अनेक घटना समोर येत आहेत. ज्यात लोकांना अचानक हार्ट अटॅक येऊन त्यांचं निधन झालं. हैराण करणारी बाब म्हणजे जास्तीत जास्त घटना 20 ते 30 वर्षाच्या तरूणांसोबत घडल्या.

का वाढत आहेत हार्ट अटॅकच्या केसेस?

हृदय आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव असतो. याचं काम पूर्ण शरीरात ऑक्सिजन आणि रक्त पुरवठा करणं आहे. एकप्रकारे हृदय आपल्या शरीरातील इतर अवयव जिवंत ठेवण्याचं काम करतं. गेल्या काही वर्षात हृदयरोग आणि हार्ट अटॅकच्या केसेस वेगाने वाढल्या आहेत. सामान्यपणे 40 ते अधिक वयापेक्षा जास्त लोक ज्यांना हार्ट, हायपरटेंशनसारखे आजार आहेत, त्यांच्यात हार्ट डिजीज जास्त आढळून येतात. पण आता तरूणांनाही हृदयरोग होत आहेत. यामुळे कमी वयातच त्यांचा मृत्यू होत आहे. 

लोकांमध्ये हृदयरोगांबाबत फार कमी जागरूकता आहे. एका रिपोर्टनुसार, देशातील 50 टक्के रूग्ण वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचू शकत नाहीत. अनेकदा लोक हृदयरोगांकडे दुर्लक्ष करतात. छातीत होणाऱ्या वेदनेला गॅसची समस्या समजतात आणि मग स्थिती आणखी बिघडते. ज्यामुळे हार्ट अटॅक येतो. तज्ज्ञांनी सांगितलं की, कोरोनानंतर अनेक लोकांमध्ये रक्त पातळ झाल्याची समस्या बघण्यात आली आहे. हृदयाच्या आर्टरीजमध्येही ब्लड क्लॉट तयार झाल्याने हार्ट फंक्शन प्रभावित होतं, ज्याने हार्ट अटॅक येतो.

- जर परिवारातील एखाद्या सदस्याला हृदयरोग असेल तर त्यामुळे कमी वयाच्या लोकांनाही हृदयरोग होण्याची शक्यता असते.

- डायबिटीसच्या रूग्णांनाही हार्ट अटॅक येण्याचा धोका जास्त असतो.

- त्याशिवाय तरूणांमधील हायपरटेंशनची समस्याही हार्ट अटॅकचं कारण ठरू शकते.

- जास्त वजन आणि लठ्ठपणामुळे हृदयरोग होतात.

- सिगारेट, दारूचं सेवन केल्यानेही हृदयरोग वाढतात.

- खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि तणावामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

हार्ट अटॅकची लक्षणे ओळखा

या आजारापासून वाचवण्यासाठी सगळ्यांना याच्या लक्षणांकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. अनेकदा लोक हार्ट अटॅकला छातीत वेदना होण्याच्या समस्येला गॅसची समस्या समजतात. त्यामुळे गरजेचं आहे की, तुम्ही याच्या लक्षणांकडे लक्ष द्या. 

गॅसची समस्या झाली तर डाव्या हातात वेदना, घाबरलेपणा आणि घाम येत नाही. त्यामुळे जर छातीत दुखत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.हार्ट अटॅक दरम्यान होणारी वेदना गॅस किंवा इतर आजारापेक्षा वेगळी असते. यात छातीत दबाव, आखडलेपणा किंवा पिळल्यासारखं वाटतं.तसेच, थंड घाम येणे, थकवा जाणवणे, अस्वस्थता वाटणे, उलटीसारखं वाटणे, चक्कर येणे या लक्षणांचाही समावेश आहे.

हार्ट अटॅकची लक्षणे दिसली तर काय करावं?

डॉक्टरांनी सांगितलं की, जर एखाद्या व्यक्तीला हृदयरोग असेल आणि अचानक त्याला हार्ट अटॅकची लक्षणं दिसली तर त्यांनी लगेच घरातील लोकांना, नातेवाईकांना, शेजाऱ्यांना किंवा अॅम्बुलन्सला बोलवावं.

अचानक हार्ट अटॅकची लक्षणे दिसली तर घरात असलेली एस्पिरिन(डिस्प्रिन)ची गोळी खावी. जर तुम्ही ही गोळी पाण्यासोबत गिळण्याऐवजी चावून खाल तर जास्त फायदा होईल.

जर एखाद्या व्यक्ती हार्ट अटॅकची लक्षणे दिसली तर तुम्ही त्यांचा जीव वाचवण्यासाठी CPR ची मदत घेऊ शकता. CPR एक अशी स्थिती आहे ज्यात छातीवर हाताने पुन्हा पुन्हा दबाव दिला जातो. जेणेकरून त्यांचं ब्लड सर्कुलेशन सुरू रहावं. त्यासोबतच हार्ट अटॅकच्या स्थितीत व्यक्तीला बेसिक लाइफ सपोर्ट आणि अॅडव्हांस लाइफ सपोर्ट दिल्यानेही फायदा होतो.

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाHeart DiseaseहृदयरोगHealth Tipsहेल्थ टिप्स