Health Tips : आजकाल बॉटलऐवजी कॅनमधून बीअर किंवा कोल्ड ड्रिंक पिण्याची फॅशनच झाली आहे. बरेच लोक हे पेय कॅनमधून पितात. मात्र, एका रिसर्चनुसार, थेट कॅनमधून काही पिणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. त्यामुळे तुम्ही जर कॅनमधून काही पित असाल तर वेळीच सावध व्हा. वैज्ञानिकांनी इशारा दिला आहे की, ही सवय तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. कॅनवर असलेले बॅक्टेरिया आणि नुकसानकारक केमिकल्समुळे गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.
हेल्थ एक्सपर्टनी सांगितलं की, कोल्ड ड्रिंक किंवा बीअरच्या कॅन स्टोर करतेवेळी आणि ट्रान्सपोर्ट करताना अनेक घातक तत्वांच्या संपर्कात येऊ शकतात. सामान्यपणे या कॅन धुवून स्वच्छ केल्या जात नाहीत, ज्यामुळे त्यावर बॅक्टेरिया आणि इतर जंतू असू शकतात. स्टोरहाऊसमध्ये ठेवलेल्या कॅन्सवर उंदरं फिरू शकतात, त्यावर त्यांची लघवी आणि विष्ठा राहू शकते. जर एखादी व्यक्ती अशा कॅननं थेट ड्रिंक पित असतील तर त्यांना गंभीर बॅक्टेरिअल इन्फेक्शन होऊ शकतं.
एक्सपर्टनुसार, या कॅन्सच्या माध्यमातून पसरणाऱ्या आजारात सगळ्यात गंभीर आहे 'लेप्टोस्पायरोसिस'. हे एक बॅक्टेरिअल इन्फेक्शन आहे. जे मनुष्य आणि प्राणी दोघांनाही प्रभावित करतं. सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅन्ड प्रिवेंशन (CDC) नुसार, या आजारानं संक्रमित लोकांमध्ये डोकेदुखी, ताप, पोटात वेदना आणि डायरियासारखी हलकी लक्षणं दिसू शकतात. गंभीर केसेसमध्ये या इन्फेक्शनमुळे किडनी किंवा लिव्हर फेलिअर, श्वास घेण्यास समस्या आणि इतर गंभीर समस्यांचा कारण ठरतं.
केमिकल्स आणि शार्प कोपऱ्याचा धोका
त्याशिवाय कॅनच्या आथील कोटिंगमधील बिस्फेनॉल ए नावाचं केमिकलही आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. रिसर्चमधून समोर आलं की, हे केमिकल शरीराच्या हार्मोन सिस्टीमला प्रभावित करतं आणि अनेक गंभीर आजारांचं कारण ठरू शकतं. तेच कॅनचे कोपरे धारदार असतात, ज्यामुळे पिताना ओठ किंवा तोंड कापण्याचा धोकाही असतो.