पाणी हे जीवन आहे. पाण्याने शिवाय आपण जगूच शकत नाही. पाण्याचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. दिवसभरातून सात ते साठ ग्लास पाणी पिण्याचा सल्ला एक्सपर्ट देत असतात. वजन कमी करण्यासाठीही पाणी फायदेशीर ठरतं. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, जेवण करण्याआधी २ ग्लास पाणी पिण्याचा वजन कमी होण्याशी खोलवर संबंध असू शकतो. एका रिसर्चमधून याबाबत खुलासा करण्यात आला आहे.
JAMA नेटवर्क ओपनमध्ये प्रकाशित या रिसर्चमध्ये पाणी पिण्याची सवय आणि आरोग्यावर याचे प्रभाव याबाबत विश्लेषण करण्यात आलं आहे. अभ्यासकांनी १,४६४ रिसर्चचा अभ्यास करून १८ रॅंडमाइज्ड क्लीनिकल ट्रायल्सला निवडलं. या ट्रायल्सचा कालावधी ४ दिवसांपासून ते ५ वर्षापर्यंत होता.
रिसर्चमधून आढळून आलं की, जेवणाआधी २ ग्लास पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यास भरपूर मदत मिळू शकते. तीन ट्रायल्समधून समोर आलं की, ज्या सहभागी लोकांनी जेवणाआधी पाणी सेवन केलं त्यांचं वजन आपल्या पाण्याच्या सवयीत कोणताही बदल न करणाऱ्यांच्या तुलनेत दुप्पट कमी झालं.
ब्लड शुगर आणि इतर फायदे
डायबिटीसच्या रूग्णांमध्ये आढळलं की, जेवणाआधी पाणी प्यायल्याने त्यांच्या उपवासाच्या ब्लड शुगर लेव्हलमध्ये सुधारणा झाली. याचं कारण पाणी प्यायल्याने पोट भरलेलं राहतं, अशात जेवण कमी केलं जातं. त्याशिवाय इतर ट्रायलमध्ये महिलांनी रोज पाणी पिण्याचं प्रमाण १,५०० मिलीलीटरने वाढवलं. ज्यामुळे त्यांना यूटीआय इन्फेक्शनपासून आराम मिळाला.
अभ्यासक डॉ. बेंजामिन ब्रेअर म्हणाले की, डिहायड्रेशन शरीरासाठी नुकसानदायक आहे. खासकरून किडनी स्टोन किंवा यूटीआयचा इतिहास असलेल्या व्यक्तींसाठी. तेच पुन्हा पुन्हा लघवीची समस्या असलेले लोक पाणी कमी पिऊन फायदा मिळवू शकतात.