शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

टॉयलेटमधील हॅंड ड्रायरचा वापर आरोग्यासाठी धोकादायक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 10:36 IST

अनेकदा पब्लिक टॉयलेट्सचा वापर केल्यावर तुम्ही तिथे असलेल्या हॅंड ड्रायरने हात कोरडे केले असतील. पण आता तुम्ही या हॅंड ड्रायरचा वापर करणे लगेच बंद केले पाहिजे.

(Image Credit : AOL.com)

अनेकदा पब्लिक टॉयलेट्सचा वापर केल्यावर तुम्ही तिथे असलेल्या हॅंड ड्रायरने हात कोरडे केले असतील. पण आता तुम्ही या हॅंड ड्रायरचा वापर करणे लगेच बंद केले पाहिजे. तुम्ही म्हणाल आता याची काय समस्या आहे? तर नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून हॅंड ड्रायरबाबत एक धक्कादायक खुलासा झाला आहे. टॉयलेटमध्ये असणाऱ्या हॅंड ड्रायरने तुमचे हात कोरडे होतात, पण सोबतच अस्वच्छही होतात.   

अप्लाइड अॅंन्ड इन्वायरनमेंटल मायक्रोबायोलॉजी नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित या अभ्यासात सांगण्यात आलं आहे की, टॉयलेटमध्ये ठेवण्यात आलेल्या हॅंड ड्रायरसमोर केवळ ३० सेकंदासाठी ठेवण्यात आलेल्या प्लेट्सवर १८ ते ६० बॅक्टेरिया आढळले. या अभ्यासाच्या लेखकांनी सांगितले की, या अभ्यासातून हे समोर आलंय की,  पॅथोजन आणि स्पोर्ससारखे बॅक्टेरिया हॅंड ड्रायरसमोर हात धरल्यास तुमच्या हातावर येतात.

टॉयलेटच्या दूषित हवेला पसरवतो ड्रायर

अभ्यासाच्या लेखकांना आढळलं की, ड्रायरच्या तोंडाशी बॅक्टेरिया कमी होते. पण या बॅक्टेरिया आश्रय घेत आहे हे सिद्ध करण्यासाठी आणखी काही पुराव्यांची गरज पडणार आहे. टॉयलेटची दूषित हवा पसरवण्याबाबतही असेच म्हणावे लागेल. असे यासाठी म्हणावे लागेल कारण टॉयलेटच्या हवेत शौचातील तत्व आणि लघवीचे छोटे छोटे थेंबही असू शकतात. 

रोगप्रतिकारक शक्ती होते कमी

या अभ्यासाचे लेखक पीटर सेटलो म्हणाले की, 'टॉयलेटची हवा जितकी जास्त पसरेल तितके बॅक्टेरिया तुमच्या शरीरावर आणि हातावर चिकटतील. अशात ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर आहे. ते लगेच आजारी पडू शकतात. त्यामुळे बॅक्टेरिया टाळण्यासाठी लोकांनी प्रयत्न केले पाहिजे. मी हॅंड ड्रायरचा वापर बंद केला आहे'.

हॅंड ड्रायरला फिल्टर असणं गरजेचं 

असे असले तरी अभ्यासात हेही सांगण्यात आले आहे की, काही हॅंड ड्रायर्स ज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर लावलेले असतात. याप्रकारचे हॅंड ड्रायर्स बॅक्टेरिया काही प्रमाणात रोखू शकतात.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स