जास्त ताण घेतल्यानंही वाढू शकतो कमरेचा आकार? जाणून घ्या जीमला न जाता कशी कमी करायची पोटाची चरबी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 01:54 PM2021-02-11T13:54:32+5:302021-02-11T14:49:42+5:30

Weight loss tips in marathi : हा हार्मोन ब्लड शुगर आणि मेटाबॉलिज्म नियंत्रित करण्यासाठी  प्रभावी ठरतो.

Stress belly 8 things you can do to get rid of abdominal fat boost weight loss | जास्त ताण घेतल्यानंही वाढू शकतो कमरेचा आकार? जाणून घ्या जीमला न जाता कशी कमी करायची पोटाची चरबी

जास्त ताण घेतल्यानंही वाढू शकतो कमरेचा आकार? जाणून घ्या जीमला न जाता कशी कमी करायची पोटाची चरबी

googlenewsNext

स्ट्रेस बेली एक असा प्रकार आहे. ज्याद्वारे वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेस आणि हाॉर्मोन्स आपल्या वजनाला प्रभावित करत असतात. खासकरून जेव्हा पोटाबाबत बोल्लं जातं तेव्हा असा प्रकार घडून येतोच. कोर्टीसोल   हा उच्च स्तर प्रायमरी स्ट्रेस हार्मोन आहे. ज्यामुळे पोटाची चरबी सुटण्याच्या सामना करावा लागू शकतो. एड्रेनल ग्लँड्समध्ये असलेला हा हार्मोन ब्लड शुगर आणि मेटाबॉलिज्म नियंत्रित करण्यासाठी प्रभावी ठरत असतो. कोर्टिलोसच्या वाढलेल्या स्तरामुळे ओबेसिटीचा सामना करावा लागू शकतो.

जर तुम्ही दीर्घकाळापासून स्ट्रेसचा सामना करत असाल तर आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.  कोर्टीसोलचे प्रमाणही वाढते. क्रॉनिक स्ट्रेसद्वारे कोर्टिसोल लेव्हलवर परिणाम होतो. त्यामुळे वजन कमी वाढण्याची आणि एबडॉमिनल ओबेसिटीचा सामना करावा लागतो.  सायकोसोमॅटीक मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार  ज्या लोकांच्या शरीरातील कॉर्टीसोलचे प्रमाण जास्त असते. त्यांच्या कमरेचा आकार वाढतो. तसंच बीएमआयही  तुलनेनं जास्त असतो.

 २०१८  मधील एका अभ्यासानुसार असे आढळले की ज्यांच्या शरीरात बराच काळ कॉर्टिसॉलची पातळी असते. त्यांनाही ओटीपोटात लठ्ठपणा उद्भवतो. तथापि, हे देखील आढळून आले आहे की लठ्ठपणा असलेल्या सर्व लोकांमध्ये कॉर्टिसॉलचे प्रमाण जास्त नसते कारण ग्लूकोकोर्टिकॉइड संवेदनशीलतेमध्ये अनुवांशिकतेची भूमिका असू शकते. आपले वय आणि अनुवांशिकता यांसारखे विविध घटक आपल्या शरीरात चरबी संग्रहित करतात. परंतु तरीही आपल्या पोटातील चरबीपासून मुक्त होण्यासाठी आणि वजन कमी करण्यास तुम्ही काही उपाय करू शकता.

उपाय

ताण-तणाव  घेऊ नका

वर नमूद केल्याप्रमाणे, ताण आपले वजन वाढवते. विशेषत: पोटाजवळची चरबी. म्हणूनच, स्वत: ला तणावमुक्त ठेवण्यासाठी आपण विचार केला पाहिजे आणि त्यांचे अनुसरण केले पाहिजे. योग, ध्यान, व्यायाम इत्यादी उपायांनी आपण स्वत: ला ताणमुक्त ठेवू शकता.

व्हिटामीन सी युक्त आहार घ्या

वजन कमी करणं असो अथवा वाढवणं असो. या स्थितीत तुम्हाला डाएट खूप महत्वाचं असतं.  त्यासाठी व्हिटामीन सी असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. पोट कमी करण्यासाठी योग्य आहार घेणं गरजेचं  असतं. त्यासाठी फळं, ताज्या भाज्या, गरम पाणी, लिंबू यांचा आहारात समावेश करा. 

झोप पूर्ण करणे

रोजच्या कामामुळे वेळेचा अभाव आणि थकवा आल्यामुळे आपली झोप पुर्ण होत नाही. ७ ते ८  तास झोप घेणं गरजेचं असतं. जर तुम्ही रात्री उशीरापर्यंत जागे राहत  असाल तर  तुमचं पोट जास्त वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे चांगली झोप घेणं आवश्यक आहे. कारण झोप झाली नाही तर हार्मोनल इंबॅलेन्स होण्याची शक्यता असते. सकाळी उठल्या उठल्या पोट साफ होत नाही? मग गॅस, पोटदुखीची चिंता सोडा, या उपायांनी समस्या होईल दूर

योगा

योगा करणं आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरत असतं. रोज पोट कमी करण्यासाठी तुम्ही ठरावीक पद्धतीने योगा कराल कर शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होईल.  तुम्हाला जीमला जाण्याची सुद्धा गरज भासणार नाही. घरच्याघरी मॅट घालून तुम्ही या फोटोत दाखवल्याप्रमाणे स्थितीत बसून योगा करू शकता.  चिंताजनक! महाराष्ट्रातील 'या' 3 शहरात वाढतोय कोरोनाचा धोका; अधिक सावध राहावं लागणार

Web Title: Stress belly 8 things you can do to get rid of abdominal fat boost weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.