संघर्ष अन् मीलनाची विलक्षण प्रेमकथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 02:09 IST2016-02-12T13:18:02+5:302016-02-18T02:09:33+5:30
संघर्ष अन् मीलनाची विलक्षण प्रेमकथा असलेल्या ‘फितूर’ या चित्रपटात कैटरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूरची हटके जोडी असल्याने या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.

संघर्ष अन् मीलनाची विलक्षण प्रेमकथा
चार्लीस डिकेन्सची प्रसिद्ध कादंबरी ‘ग्रेट एक्सपेक्टेशंस’वर आधारित अभिषेक कपूरचा चित्रपट ‘फितूर’ काल प्रदर्शित झाला आहे. संघर्ष अन् मीलनाची विलक्षण प्रेमकथा असलेल्या या चित्रपटात कैटरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूरची हटके जोडी असल्याने या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर कैटरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर यांनी ‘लोकमत’च्या संपादकीय टीम सोबत विशेष चर्चा केली.
प्रश्न - चित्रपट स्वीकारण्याआधी ‘ग्रेट एक्सपेक्टेशंस’ ही कादंबरी वाचली होती?
कैटरिना - हो, मी आधीच कादंबरी वाचली आहे. ही जगातील ग्रेट रोमांटिक कादंबरी म्हणून प्रसिद्ध आहे. स्क्रिप्टबाबत बोलायचे तर कांदबरी आणि स्क्रिप्टमध्ये थोडे वेगळेपण जाणवते. मूल्यमापन करता येणार नाही. पण, मी एवढे नक्की सांगू शकते. ही कादंबरी जेवढी क्लासिक आहे, तेवढाच आमचा चित्रपट शानदार बनला आहे. प्रेक्षकांना तो नक्की आवडेल.
आदित्य - मी कादंबरी मुद्दाम वाचली नाही. कारण माझ्यावर कादंबरीचा प्रभाव जाणवावा, अशी माझी इच्छा नव्हती. मात्र हो, मी तो हॉलिवूडचा चित्रपट पाहिला आहे जो याच कादंबरीवर बनला होता. खरे सांगायचे तर मला तो चित्रपट फार आवडला नव्हता. मात्र जेव्हा मला अभिषेक कपूरने स्क्रिप्ट सांगितली तेव्हा ती ऐेकताना मला खूप मजा आली. आता मी ती कादंबरी नक्कीच वाचेल.
नैसर्गिक सौंदर्यात राहणे खूपच चांगल
प्रश्न -काश्मिरातील शूटिंगचा अनूभव कसा राहिला?
कैटरिना - खूपच मजा आली. मी याआधीही तेथे शूटिंग केली आहे. तेथे जाणे कायमच मजेशीर वाटते. चिंता विसरुन आपण तेथील नैसर्गिक सौंदर्यात रमतो. मला आठवते, तेथे शेड्यूल पूर्ण झाले. परंतु वातावरणाच्या बदलामुळे विमान रद्द झाले आणि आम्ही तेथील हॉटेलच्या कर्मचाºयांसोबत क्रिकेट खेळलो.
आदित्य - मीसुद्धा काश्मिरात आधी शूटिंग केली आहे. तेथील लोक खूप मनमिळावू आहेत. कुठल्याही गोष्टीला सहकार्य करतात आणि काळजीदेखील घेतात. बॉलिवूडच्या चित्रपटांची शूटिंग सुरू असली की या लोकांना खूप आनंद होतो.
प्रश्न - या चित्रपटाची कथा आणि भूमिकांविषयी काय सांगाल?
कैटरिना - हा चित्रपट म्हणजे फिरदौस (कैट) आणि नूर (आदित्य राय कपूर) यांची लव स्टोरी आहे. फिरदौसचा अर्थ आहे स्वर्ग आणि नूरचा अर्थ प्रकाश. दोघेही एकमेकांशिवाय अर्धवट आहेत. हा चित्रपटाचा सार आहे. एक मुलगा, एक मुलगी. त्यांच्या आपसातील समस्या, आई-वडील, कुटुंबाचा तणाव, समाजाच्या दबावाचे चित्रण यात करण्यात आले आहे. हा चित्रपट नात्याची गुंतागुंत आणि समाजाचा व्यवहार प्रेक्षकांसमोर मांडतो.
आदित्य - नूर काश्मीरच्या एका सामान्य परिवारातील एक मुलगा आहे. त्याला लहानपणापासून पेटिंगची आवड असते आणि लहानपणापासूनच तो फिरदौसला पसंत करतो. प्रत्यक्ष आयुष्यात मी मूळचा मुंबईचा मुलगा आहे आणि पेंटिंगच्या बाबतीत मला जास्त आवड नाही. यामुळे काश्मीरच्या मुलाचे हावभाव आणि विशेषत: पेंटिंगला समजण्यासाठी मला विशेष मेहनत घ्यावी लागली. अभिनय चांगला होण्यासाठी बºयाच लोकांशी चर्चा केली, पेंटिंगचे क्लासेसदेखील लावले.
प्रश्न - या भूमिकेसाठी विशेष कोणती तयारी करावी लागली?
कैटरिना - भूमिका कोणतीही असो मेहनत तर करावीच लागते. आधी कॅरेक्टर समजून घ्यावे लागते. त्याच्या गरजा ओळखून मग पूढे जावे लागते. हेच सर्व या चित्रपटासाठी केले.
आदित्य - दर्शक ांना कॅरेक्टरमध्ये विश्वास निर्माण व्हावा, हे सर्वात महत्त्वाचे आहे. नाहीतर सर्व बनावट वाटेल. म्हणूनच मी ही भूमिका करताना आधी पेंटिंगला समजून घेतले. जे माझ्यासाठी खूप गरजेचे होते.
प्रश्न- दीपिका, कंगना, प्रियंका यातील तुझी स्पर्धक कोण?
cnxoldfiles/strong> मला हा प्रश्नच मान्य नाही. प्रत्येक जण कलाकार आहे आणि प्रत्येकाची एक विशेषत: आहे. मी कधीच कोणाला कमी- जास्त लेखले नाही. आमचे काम किती चांगले आहे हे प्रेक्षक ठरवत असतात.