शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

तोंडाचा अल्सर माहीत असेलच, आता पोटाच्या अल्सरची लक्षणे, कारणे अन् बचावाचे उपाय वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 14:59 IST

Stomach Ulcer: तोंडात फोडं येण्याला अल्सर म्हणतात हे तुम्हाला माहीत असेलच. पण अनेकांना ही माहीत नसतं की, तोंडाप्रमाणे पोटातही अल्सर होतो.

Stomach Ulcer: असे अनेक आजार असतात ज्यांबाबत लोकांना फार कमी माहिती असते. अलिकडे या आजारांची माहिती लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि लोक आजारांबाबत जागरूक होत आहेत. अशीच एक गंभीर समस्या म्हणजे अल्सर. तोंडात फोडं येण्याला अल्सर म्हणतात हे तुम्हाला माहीत असेलच. पण अनेकांना ही माहीत नसतं की, तोंडाप्रमाणे पोटातही अल्सर होतो. जो फार घातक ठरू शकतो.

पोटात अल्सरची कारणे

पोटातील अल्सर छोट्या आतड्यांच्या सुरूवातीच्या भागात किंवा म्यूकलवर होतो. याची काही मुख्य कारणं पोटात अ‍ॅसिडचं प्रमाण वाढणं, चहा, कॉफी, सिगारेट आणि मद्यसेवन हे आहेत. त्यासोबतच जास्त आंबट खाणे, मसालेदार खाणे आणि गरम पदार्थ खाणे यानेही पोटात अल्सर होतात. 

स्ट्रेसमुळे हार्मोनल इनबॅलन्स होतात. यामुळेही पोटात अ‍ॅसिड तयार होतं. जर तुम्ही नेहमीच जास्त स्ट्रेसमध्ये राहत असाल तर पोटात अल्सर होण्याचं हे कारण ठरू शकतं. 

पोटाच्या अल्सरची लक्षणे?

1) पोटाच्या वरच्या भागात वेदना - अल्सरची समस्या झाल्यावर पोटाच्या वरच्या बाहेरील भागात वेदना होऊ लागतात. अल्सरमध्ये जेवण केल्यावर पोटात वेदना होतात. तसेच पोट रिकामं असेल तरी वेदना होतात. या स्थितीत अन्न नलिकेच्या खालच्या भागात फोडं येतात. कधी-कधी अन्न नलिकेला छिद्रही पडतं.

2) अ‍ॅसिड तयार होणं - आपण जेव्हा काही खातो तेव्हा पोटात हायड्रोक्लोरिक अॅसिड तयार होतं. याने अन्न पचन होत असतं. कधी कधी पोट खराब झाल्यावर हे अ‍ॅसिड वर अन्न नलिकेत जातं आणि जळजळ वाटू लागते. याचा प्रभाव घशात, दातांवर, श्वासांवर पडू लागतो. यानेच तोंडातही फोडं येतात. 

3) वजन कमी होणे - पोटाच्या अल्सरने ग्रस्त लोकांचं वजन फार वेगाने कमी होऊ लागतं. याचं कारण म्हणजे अल्सर झाल्यार व्यक्ती खाण्याबाबत उदासीन होतो. त्यामुळे वजन कमी होऊ लागतं. त्यासोबतच अन्न पचनही होत नसल्याने वजन कमी होऊ लागतं.

4) अ‍ॅसिडिटीची समस्या - अल्सरमुळे छातीत दुखण्याची समस्याही होते. या वेदना अॅसिडिटी रिफ्लेक्शनमुळे होतात. हृदयात होणाऱ्या वेदना या छातीच्या वरच्या भागात होतात आणि कधी कधी अॅसिडिटीमुळे त्याच जागी वेदना होतात. त्यामुळे यात फरक करणे कठीण होऊन बसतं.

5) रक्ताची उलटी - अल्सरमध्ये असं आढळतं की, उलटी होते किंवा उलटीसारखं वाटतं. जेव्हा अल्सर वाढतो तेव्हा त्रास आणखी वाढतो. कधी कधी उलटीतून रक्तही येऊ शकतं. अशात विष्ठेचा रंगही काळा होतो.

कसा कराल बचाव

- सगळ्यात आधी तर जंक फूड, तळलेले पदार्थ, जास्त तेलकट पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. 

- पेनकिलर, एस्पिरिन, आइब्रूप्रोफेनसारख्या औषधांमुळेही समस्या होते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही औषधं खाऊ नका.

- आहारात मोड आलेले कडधान्य, हिरव्या पालेभाज्या आणि वेगवेगळ्या फळांचा समावेश करा.

- स्ट्रेस दूर करण्यासाठी योगा, मेडिटेशन आणि एक्सरसाइजची मदत घ्या. हेल्दी लाइफस्टाईल फॉलो करा.

- जर तुम्हाला पोटाच्या अल्सरपासून वाचायचं असेल तर धुम्रपान पूर्णपणे बंद करा.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य