शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'हे' पदार्थ फक्त भिजवून तर खा! आसपास फिरकणारही नाहीत रोग, राहाल आयुष्यभर निरोगी....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 17:30 IST

आम्ही तुम्हाला असे पदार्थ सांगणार आहोत जे भिजवून खाल्ल्याने तुमच्या शरिराला बराच फायदा होतो. भिजवून ठेवल्याने यापैकी काही पदार्थांना मोड येतात व त्यामुळे त्याची पौष्टीकता दुप्पट वाढते...

काही खाण्याचे पदार्थ असे असतात की ते भिजवून खा्ल्ले तर आरोग्याला अधिक फायदा होतो. हे वाचल्यावर तुम्हाला अशा काही पदार्थांची नाव लक्षातही आली असतील. डॉ. अबरार मुलतानी यांनी झी न्युज हिंदीला दिलेल्या माहितीनूसार आम्ही तुम्हाला असे पदार्थ सांगणार आहोत जे भिजवून खाल्ल्याने तुमच्या शरिराला बराच फायदा होतो. भिजवून ठेवल्याने यापैकी काही पदार्थांना मोड येतात व त्यामुळे त्याची पौष्टीकता दुप्पट वाढते...

बदाम भिजवून खाणेरात्री कोमट पाण्यात बदाम भिजवल्याने फायटिक आम्लाचे प्रमाण कमी होते. फायटिक आम्लाचे प्रमाण जास्त झाल्यास कॅल्शियम, झिंक आणि मॅंगनीजची कमतरता भासू शकते. म्हणूनच, भिजलेल्या बदामांचे सेवन करावे. भिजवलेल्या बदामांमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असते. जे टाईप २ डायबिटीस असलेल्या लोकांसाठी देखील खूप उपयुक्त आहे. योग्य प्रमाणात मॅग्नेशियम सेवन केल्यास शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी होते. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका देखील कमी होतो.

चणे भिजवून खाणेरात्री भिजवलेले चणे सकाळी उठून खाल्ले तर त्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला होतील. खरं तर चण्यामध्ये अनेक पौष्टिक पदार्थासोबतच व्हिटॅमिन आणि खनिजे असतात. चणे खाणे फक्त आपल्या आरोग्यासाठीच नाही तर चणे खाल्ल्याने आपले वजन देखील कमी होण्यास मदत होते.

मनुके भिजवून खाणेरात्रभर भिजून ठेवलेले मनुके सकाळी खाल्ल्याने तसेच ते पाणी प्यायल्याने यातील अँटिऑक्सिडेन्ट कन्टेन्टमुळे  रोगप्रतिकारक शक्ती वाढवते व व्हायरस आणि बॅक्टरीयापासून संरक्षण मिळते. मनुक्यांमध्ये असणारे पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते तसेच हायपरटेन्शनची समस्याही दूर करते. यात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स जास्त असल्याने अ‍ॅनिमिया होत नाही व लोहाचे प्रमाण वाढते. मनुका पचनक्रियेस मदत करतं कारण यात मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. तसेच यामध्ये फायबर आणि कॅलरी जास्त असल्याने हाड मजबूत होतात.

भिजवलेले मूग खाणेमूग भिजवले की मुगाला मोड येतात. मोड आलेले मूग नियमित खाल्ल्यास आरोग्य चांगले राहते. यातील मॅग्नेशिअम, कॉपर, फोलेट, रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन, व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशिअम तसेच एमिनो अ‍ॅसिड आणि पॉलिफेनॉल्ससारखी तत्व भरपूर असतात. यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे होतात. यातील फायबरमुळे पोटाचे विकार, पोटदुखणे या समस्या होत नाहीत. शरीरातील टॉक्सिक बाहेर काढण्यास मदत होते. पचनक्रिया चांगली राहते.यातील सायट्रोजन शरीरात कोलेजन आणि एलास्टिन कायम ठेवतात. याने चेहऱ्यावर वय दिसून येत नाही. चेहराही चमकदार राहतो.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स