शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

...म्हणून व्यायाम केलाच पाहिजे; ऐका सेलेब्रिटींच्या फिटनेस एक्स्पर्टकडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 09:55 IST

अनेकजण तज्ज्ञांचा सल्ला फारसा गांभीर्याने घेत नाहीत आणि वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर शरीराच्या व्याधींना सामोरे गेल्यावर त्यांना व्यायामाचे अचानक महत्त्व जाणवू लागते.

- लीना मोगरेसेलेब्रिटी फिटनेस एक्स्पर्ट

आपण नेहमी तज्ज्ञांकडून ऐकत असतो. शरीर चांगले सुदृढ आणि आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर नियमित व्यायाम केला पाहिजे. रोज ठरवून विशिष्ट वेळेत शारीरिक हालचाल करणे गरजेचे आहे. त्यामध्ये रोज चालणे, प्राणायाम, योग घरच्या घरी किंवा जिममध्ये व्यायाम केला पाहिजे. मात्र, अनेकजण तज्ज्ञांचा सल्ला फारसा गांभीर्याने घेत नाहीत आणि वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर शरीराच्या व्याधींना सामोरे गेल्यावर त्यांना व्यायामाचे अचानक महत्त्व जाणवू लागते. अनेकजण वेळ नसल्याचे कारण पुढे करतात तर काही जण कंटाळा करत व्यायामाकडे दुर्लक्ष करतात. मात्र, व्यायाम न केल्यामुळे त्यांना कधी तरी आयुष्यात त्रास होतो. व्यायाम केल्याने आपण दिवसभर उर्जादायी राहू शकतो.

पावसाळा आला की, बहुतेक जणांचे बाहेर चालायला जाणे किंवा जिमला जाणे बंद होते. त्यामुळे अनेकजणांची चिडचिड होते. त्यामुळे या काळात घरी बसून कसा व्यायाम करता येईल, याचा ते विचार करतात. अनेकांना घरी व्यायाम कसा करायचा, हा प्रश्न पडतो.  बाहेर जाऊन चालल्यावर जितके फ्रेश वाटते तितके त्यांना घरात वाटत नाही, असे काही लोकांचे म्हणणे असते. त्यांनी पावसाळ्यात घरच्या घरी सोपा व्यायाम करावा. 

काय आहेत फायदे ? nवजन संतुलित राहण्यास मदत होते. nनैराश्याचे प्रमाण कमी होते. nतणावाचा सामना सक्षमपणे करता येतो.nहृदय आणि रक्तदाब विकार होत नाही.nशरीर आकर्षक राहते, त्यामुळे व्यक्तिमत्व उजळून निघते.nशरीरातील हाडे मजबूत होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. nमन उत्साही राहून काम करण्याची क्षमता वाढते.nचेहऱ्यावर तेज निर्माण होऊन त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते. nव्यायाम केल्याने दीर्घायुष्य लाभते.nजेव्हा तुम्ही आराम करता, त्यावेळी चरबी विरघळण्याची क्षमता वाढते.  

घरच्या घरी व्यायाम nघरीच दोन डंबेल्स आणून व्यायाम करता येऊ शकतो. nजोर, बैठका आणि सूर्यनमस्कार करता येतात.nयोग, पॉवर योग, एरोबिक डान्सिंग करता येते.

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्स