स्मिताच्या चाहत्यांना खूषखूूबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 21:49 IST2016-02-19T04:49:28+5:302016-02-18T21:49:28+5:30
कोण स्मिता हा प्रश्न नक्कीच पडला असेल ? तर ऐका, काही दिवस मागे जावून पप्पी दे पप्पी दे पारू ला हे फेमस गाणं आठवतं का? येस.., याच गाण्यातील जी पारू आहे म्हणजेच स्मिता गोंदकर.

स्मिताच्या चाहत्यांना खूषखूूबर
क ण स्मिता हा प्रश्न नक्कीच पडला असेल ? तर ऐका, काही दिवस मागे जावून पप्पी दे पप्पी दे पारू ला हे फेमस गाणं आठवतं का? येस.., याच गाण्यातील जी पारू आहे म्हणजेच स्मिता गोंदकर. ही दिनेश आनंद दिग्दर्शित मिस्टर अॅण्ड मिसेस अनवॉन्टेड या मराठी चित्रपटात झळकणार आहे. एका मोठया गॅपनंतर ती पुर्नगमन करीत असली तरी पप्पी दे पप्पी दे पारूला या गाण्याच्या स्वरूपात ती अजून ही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने, नृत्याने चाहत्यांचे मन जिंकण्याच्या तयारीत आहे. याविषयी लोकमत सीएनएक्सने संवाद साधला असता, ती म्हणाली कामामधील ताणतणावामुळे नैराश्य येऊन त्याचा परिणाम कौटुंबिक जीवनावर कसा होता या विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये एका मॉर्डन तरूणीची भूमिका साकारताना दिसणार आहे.