शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

जमिनीवर झोपणे आहे इतके फायदेशीर की पलंग सोडुन जमिनीवरच झोपाल, जाणून घ्या अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 18:36 IST

तुम्हाला पलंगावर/ गादीवर झोपण्याचा त्रास होत असेल, काही प्रकारच्या शारीरिक समस्या असतील तर एक-दोन दिवस जमिनीवर झोपण्याचा प्रयत्न करा, कदाचित तुम्हाला फायदा (Sleeping on the Floor Benefits) होईल.

लोकांना जाड गादीवर झोपण्याची सवय असते. पण, बहुतेक गाद्या या आरामदायी नसतात, त्यामुळे पाठ, कंबर, मानदुखीचा त्रास वाढतो. पलंगावर झोपण्यास त्रास होत असेल तर काही दिवस जमिनीवर किंवा फरशीवर झोपण्याचा प्रयत्न करा. आजही लहान शहरे आणि खेड्यांमध्ये बहुतेक लोक जमिनीवर चटई टाकून झोपतात. जमिनीवर झोपण्याचे फायदे आहेत आणि काही तोटेही आहेत. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शरीराची मुद्रा योग्य राहते. जर तुम्हाला पलंगावर/ गादीवर झोपण्याचा त्रास होत असेल, काही प्रकारच्या शारीरिक समस्या असतील तर एक-दोन दिवस जमिनीवर झोपण्याचा प्रयत्न करा, कदाचित तुम्हाला फायदा (Sleeping on the Floor Benefits) होईल.

उन्हाळ्यात जमिनीवर झोपल्याने थंडावा जाणवतो -SleepFoundation.org मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, उन्हाळ्यात जमिनीवर किंवा फरशीवर झोपल्याने चांगली झोप येते, कारण फरशी किंवा जमीन थंड असते. त्यामुळे शरीरातील उष्णता लवकर कमी होते. विशेषतः उन्हाळ्यात, चांगली झोप येण्यास मदत होते. मात्र, ज्यांच्याकडे एसी, कुलर आहे, ते बेडरूममध्ये बेडवर झोपणे पसंत करतात. कूलर, एसीशिवाय चांगल्या झोपेसाठी सरळ जमिनीवर किंवा फरशीवर झोपणे फायदेशीर आहे.

पाठदुखी -ज्या लोकांना कंबर किंवा पाठदुखीचा त्रास आहे, त्यांनी फक्त मजबूत पृष्ठभागावर (firm surface) झोपावे. सपाट जागेवर झोपल्याने तुम्हाला वेदना कमी होऊ शकतात. काही लोक अशा गाद्यांवर झोपतात, ज्या त्यांच्या शरीराच्या वजनासाठी खूप मऊ असतात. जेव्हा गादी खूप मऊ असते, तेव्हा तुमचे शरीर गादीवर योग्य मुद्रेत झोपू शकत नाही. त्यामुळे झोपेच्या समस्या वाढू शकतात. अशा स्थितीत तुमचा मणका अलाइनमेंटमधून थोडा बाहेर पडतो. यामुळे मणक्यावर दबाव येतो आणि पाठदुखी सुरू होते.

पोस्चर सुधारला जाऊ शकतो -

जमिनीवर झोपल्याने शरीराची स्थिती योग्य राहते. चुकीच्या पद्धतीने झोपल्याने मान, पाठदुखीचा त्रास वाढतो. यामुळे लवचिकता कमी होणे, मणक्याचे चुकीचे संरेखन आणि दुखापतीचा धोका वाढू शकतो. चांगल्या पोस्चरमध्ये मणक्याच्या नैसर्गिक वक्रतेला सपोर्ट मिळतो. जमिनीवर झोपून पाठीचा कणा सरळ ठेवणे सोपे जाते, कारण मऊ गादीमध्ये शरीर सरळ राहू शकत नाही.

कोणी जमिनीवर झोपू नये -जास्त वय असलेल्या वृद्धांनी जमिनीवर झोपणे टाळावे. ज्या लोकांना काही आरोग्य समस्या आहेत जसे की, उठता-बसताना त्रास होतो, हाडांशी संबंधित समस्या इत्यादी. खाली झोपल्याने संधिवात, ऑस्टिओपोरोसिसमध्ये जास्त त्रास वाढू शकतो. विशेषत: उठताना आणि बसताना त्रास होत असेल तर जमिनीवर झोपू नका.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स