शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नवे संशोधन; दिव्याच्या प्रकाशात झोपल्यामुळे होतो मधुमेह !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 08:11 IST

नवे संशोधन; हृदयविकार तसेच अकाली निधनाचाही धोका

वॉशिंग्टन : झोप घेण्याच्या निरनिराळ्या तऱ्हा असतात. काही लोकांना गुडुप अंधारात, तर काही जणांना थोड्याशा प्रकाशात झोप घेणे आवडते. ज्यांना दिव्याच्या उजेडातच झोपी जाण्याची सवय आहे, त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होऊ शकतो असा निष्कर्ष अमेरिकेतील नव्या संशोधनातून काढण्यात आला. अशा लोकांना टाइप-२ मधुमेह, हृदयविकार होण्याची शक्यता असते.

नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या फिनबर्ग स्कूल ऑफ मेडिसीनच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. माणूस झोपी गेला की त्याच्या पापण्या मिटलेल्या असतात. मात्र, दिव्याच्या उजेडात झोपण्याची सवय असलेल्यांच्या डोळ्यांद्वारे प्रकाश शरीरात प्रवेश करतो. त्यामुळे हृद्याचे ठोके, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे भविष्यात त्या व्यक्तीला हृदरोग व टाइप-२ मधुमेह होण्याचा धोका संभवतो असे शास्त्रज्ञांनी या संशोधनाच्या निष्कर्षात म्हटले आहे. 

दिवसा हृद्याच्या ठोक्यांचे प्रमाण अधिक असते व रात्री ते कमी असते. अमेरिकी शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात सामील असलेल्या लोकांपैकी जे रात्री दिव्यांच्या प्रकाशात झोपी गेले, त्यांच्या हृदयाचे ठोके वाढले होते. त्यामुळे भविष्यात अशा लोकांचे अकाली निधन होण्याचाही धोका असतो. रात्री आपला मेंदू शरीरातील अनेक क्रिया पुन्हा मार्गावर आणण्याचे किंवा त्यात दुरुस्तीचे करीत असतो. त्यामुळे रात्री हृदयाच्या ठोक्यांची गती कमी झालेली असते. दिव्याच्या प्रकाशात झोपी जाणाऱ्या व्यक्तींमध्ये सकाळी रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. (वृत्तसंस्था)

ही घ्या खबरदारी...n खोलीत संपूर्ण अंधार करून झोपी जाणे शक्य नसेल तर अगदी कमी उजेड देणारा दिवा लावा. n लाल, केशरी रंगाचे दिवे डोळ्यांवर जास्त परिणाम करीत नाहीत. मात्र, व्हाईट किंवा निळ्या रंगाचे दिवे लावू नका. यापैकी काहीच शक्य नसेल तर झोपताना आय मास्क लावा. त्यामुळे रात्री दिव्याच्या प्रकाशापासून डोळ्यांचे रक्षण होईल व प्रकृतीवरही परिणाम होण्याचे टळेल.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स