​दुपारच्या जेवणानंतर आॅफिसात झोप येतेय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 16:35 IST2016-12-22T16:33:29+5:302016-12-22T16:35:26+5:30

बऱ्याच लोकांना दुपारच्या जेवणानंतर झोप येते. विशेषत: जेवणात दाळ, पनीर, बटाटे तसेच गोड पदार्थ असतील तर झोप येणे साहजिकच आहे. या पदार्थांना स्लीपर्सदेखील म्हटले जाते.

Sleeping in the afternoon after lunch? | ​दुपारच्या जेवणानंतर आॅफिसात झोप येतेय?

​दुपारच्या जेवणानंतर आॅफिसात झोप येतेय?

्याच लोकांना दुपारच्या जेवणानंतर झोप येते. विशेषत: जेवणात दाळ, पनीर, बटाटे तसेच गोड पदार्थ असतील तर झोप येणे साहजिकच आहे. या पदार्थांना स्लीपर्सदेखील म्हटले जाते. यांना खाल्ल्यानंतर शरीरातील नसांमध्ये ताण निर्माण होत नाही, यामुळे झोप येते. आणि आॅफिसात काम करणाऱ्यासोबत असे घडत असेल तर त्यांच्या कामात व्यत्यय येतो. शिवाय कामावरदेखील परिणाम होतो, त्यामुळे बॉसचे बोलणेही खावे लागते. या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी खालील उपाययोजना केल्यास नक्कीच फायदा होईल. 

योग्य नाश्ता करा
जर नाश्ता पौष्टिक केला असेल तर लवकर भूक लागत नाही आणि दिवसभर आपण सक्रियदेखील राहाल. त्यासाठी नाश्त्यात दही, फळे, ज्यूस, अंडी आणि मल्टीग्रेन बे्रड आदींचा समावेश असावा. ब्रेडमध्ये आपण पीनट बटर लावून खाऊ शकता.
 
थोडा व्यायाम करावा

दुपारच्या जेवणानंतर थोडे फिरायला जा. आपण स्ट्रेचिंगसारखा थोडा हलका व्यायाम पण करु शकता. आॅफिसात लिफ्ट असेल तर शक्यतो पायऱ्याचा वापर करावा. 

Web Title: Sleeping in the afternoon after lunch?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.