शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
3
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
4
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा 'इतका' दर लावला
5
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
6
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
7
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
8
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
9
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
10
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
11
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
12
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
13
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
14
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
15
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
16
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
17
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
19
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
20
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
Daily Top 2Weekly Top 5

वाढणाऱ्या प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी ऋजुता दिवेकरांच्या खास टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 15:32 IST

वायू प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी मास्क हाच एकमेव उपाय नाहीतर शरीराला वायूप्रदूषणापासून वाचवण्यासाठी इतर उपाय करणंही गरजेचं आहे.

दिल्लीत प्रदूषणाचा स्तर एवढा वाढला आहे की, भारताची राजधानी असलेल्या या शहरात 'हेल्थ एमरजेन्सी' घोषित करण्यात आली आहे. वायू प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी मास्क हाच एकमेव उपाय नाहीतर शरीराला वायूप्रदूषणापासून वाचवण्यासाठी इतर उपाय करणंही गरजेचं आहे. स्मॉग किंवा वायूप्रदूषणाचा स्तर विषारी वायूंमुळे आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतो. अशातच योग्य आहार आणि घरगुती उपाय करणं आवश्यक असतं. आज आम्ही सेलिब्रिटी डाएटिशियन ऋजुता दिवेकर यांच्या काही स्पेशल हेल्थ टिप्स सांगणार आहोत. 

सुंठ, गुळ आणि शुद्ध तुपाचे लाडू 

सुंठ, गुळ आणि शुद्ध तुप सारख्याच प्रमाणात एकत्र करून व्यवस्थित एकजीव करा. तयार मिश्रणाचे छोटे-छोटे लाडू तयार करा. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी एका लाडूचं सेवन करा. जर तुम्ही जास्त वेळ बाहेर राहत असाल तर घरी आल्यानंतर लेगच याचं सेवन करा.

फायदे 

  • ताप आणि सूज यांपासून बचाव करण्यासाठी करतं मदत.
  • नाक आणि सायनस स्वच्छ ठेवतं. 
  • पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी 

 

ऊसाचा रस प्या

वायु प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी ऊसाचा रस पिणं गरजेचं आहे. ज्यूसऐवजी तुम्ही चावून खाऊ शकता. ऊसाचा रस दुपारच्या वेळी पिणं अत्यंत फायदेशीर ठरतं. तुम्ही हा दुपारच्या जेवणा अगोदर किंवा दुपारच्या जेवणानंतर पिऊ शकता. 

फायदे

  • नियमितपणे ऊसाचा रस प्यायल्याने लिव्हरचं आरोग्य राखण्यास मदत होते. बॉडी डिटॉक्स करण्यासाठी ऊसाचा रस मदत करतो. 
  • ऊसामध्ये सुक्ष्म पोषक तत्व असतात. जी शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत करतात. 
  • स्मॉग आणि प्रदूषणामुळे होणारी सुस्ती कमी करण्यासाठी आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठीही उसाचा रस मदत करतो. 

 

दूध, केशर, हळद आणि तुळस 

रात्री झोपण्यापूर्वी गरम दूधात केसर आणि हळद एकत्र करून पिणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. परंतु, प्रदूषणामध्ये आणखी एक गोष्ट एकत्र करू शकता. सकाळच्या वेळी तुळशीची पानं चावल्यानेही फायदा होतो. 

फायदे

  • केसर शरीरासाठी फायदेशीर ठरतं. तसेच त्वाचा आणि केसांना होणारं नुकसान कमी करण्यासाठी मदत करतं. 
  • इन्फेक्शन, अॅलर्जी आणि ब्लोटिंग यांसारख्या समस्यांवर तुळस गुणकारी ठरते. 
  • हळद आणि दूधाचं सेवन अत्यंत लाभदायक असतं. शरीराचं रोगांपासून रक्षण करण्यासाठी तसेच आवस्यक ती पोषक तत्व मिळण्यासाठी फायदेशीर ठरतं. 

 

वायू प्रदूषणापासून बचाव करण्याचे उपाय 

  • जर तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर प्रदूषणात करणं टाळा. अगदीच आवश्यक असेल तर घरातच काही सोप्या एक्सरसाइज करा. 
  • मुबलक प्रमाणात पाणी आणि पेय पदार्थांचा सेवन करा. शरीर नेहमी हायड्रेट ठेवण्यासाठी प्रयत्न करा. 
  • जर प्रदूषणाचा जास्त त्रास होत असेल तर व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी12 आणि कॅरोटिन सप्लीमेंटचं सेवन करा. 

 

टॅग्स :Healthy Diet Planपौष्टिक आहारHealth Tipsहेल्थ टिप्सair pollutionवायू प्रदूषण