'या' पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे थकवा, सतत आजारी पडणे, अंगदुखीचा करावा लागतो सामना!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 11:05 AM2018-06-27T11:05:40+5:302018-06-27T11:11:01+5:30

शरीरातील प्रोटीन कमी झाल्यास, थकवा, अंगदुखी आणि सतत आजारी पडणे अशा समस्या होऊ लागतात. खालील काही लक्षणे तुमच्यात दिसत असतील तर तुमच्यात प्रोटीनती कमतरता आहे असे समजा...

Sign and symptoms of protein deficiency you should know | 'या' पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे थकवा, सतत आजारी पडणे, अंगदुखीचा करावा लागतो सामना!

'या' पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे थकवा, सतत आजारी पडणे, अंगदुखीचा करावा लागतो सामना!

Next

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी केवळ जेवण करणे इतकंच पुरेसं नसतं. तर त्यात पोषक सगळ्या प्रकारची पोषक तत्वे असायला हवेत. शरीराला इतर पोषक तत्वांसोबतच प्रोटीनचीही गरज असते. प्रोटीन कमी झाल्यास वेगवेगळ्या समस्यांचा अनेकांना सामना करावा लागतो. शरीरातील प्रोटीन कमी झाल्यास, थकवा, अंगदुखी आणि सतत आजारी पडणे अशा समस्या होऊ लागतात. खालील काही लक्षणे तुमच्यात दिसत असतील तर तुमच्यात प्रोटीनती कमतरता आहे असे समजा...

1) केसगळती आणि केसांचा पोत बिघडणे

जर तुमच्या शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर त्वचा कोरडी पडते. त्यासोबतच केसगळती आणि केसांचा पोत खराब होणे याही समस्या होतात. 

2) जखम लवकर न भरणे

तुमच्या शरीरातील स्कीन सेल्सचं प्रमाण वाढवणे किंवा नवीन सेल्स तयार करण्यासाठी प्रोटीनची गरज असते. तुम्हाला जखम झाली असेल आणि ती भरण्यात बराच वेळ लागत असेल तर तुम्हाला प्रोटीनची गरज आहे असे समजा.

3) अंगदुखी

जर तुम्हाला सतत अंगदुखी किंवा सांधेदुखी होत असेल तर प्रोटीनची कमतरता हे कारण असू शकतं. त्यामुळे प्रोटीन असणारे पदार्थ जास्त प्रमाणात खावेत.

4) तेलकट पदार्थ खाण्याची इच्छा होणे

जेवणासोबतच जर स्नॅक्स, तेलकट पदार्थ खाण्याची सतत इच्छा होत असेल तर हे प्रोटीन कमी असण्याचे संकेत आहेत. कारण या प्रकारच्या खाण्यामधून प्रोटीन कमी आणि कार्बोहायड्रेट जास्त मिळतात.

5) सतत आजारी पडणे

जर तुम्ही सतत आजारी पडत असाल तर याचं कारण तुमची रोगप्रतिकार शक्ती कमी होणे हे असू शकतं. प्रोटीन कमी झाल्यास रोगप्रतिकार शक्तीही कमी होते. 
 

Web Title: Sign and symptoms of protein deficiency you should know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.