शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

नॉनस्टिकच्या भांड्यात जेवण शिजवल्यामुळे देताय 'या' गंभीर रोगाला आमंत्रण, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 13:56 IST

नॉनस्टिकचेही अनेक तोटे आहेत. याचा वाईट परिणाम हळूहळू तुमच्या आरोग्यावर होत आहे. आज आम्ही तुम्हाला नॉनस्टिक भांड्यांमुळे होणाऱ्या संभाव्य धोक्यांबद्दल माहिती देणार आहोत.

स्वयंपाकघर मॉड्युलर होत असल्याने येथे वापरण्यात येणारी भांडीही नॉनस्टिक होत आहेत. यामध्ये, स्वयंपाक आणि त्यानंतरची साफसफाई करणे देखील सोपे आहे. स्वयंपाकासाठी तेलही कमी लागते. नॉनस्टिकचेही अनेक तोटे आहेत. याचा वाईट परिणाम हळूहळू तुमच्या आरोग्यावर होत आहे. आज आम्ही तुम्हाला नॉनस्टिक भांड्यांमुळे होणाऱ्या संभाव्य धोक्यांबद्दल माहिती देणार आहोत.

या भांड्यांचा धूर असतो विषारीपीएफओए नावाच्या कार्सिनोजेनिक रसायनापासून नॉन-स्टिक भांडी बनवली जातात. प्रत्येक वेळी ही भांडी गरम केल्यावर ते एक विषारी वास सोडतात ज्यामुळे तुम्ही आजारी पडता. जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्य पुन्हा पुन्हा एखाद्या संसर्गाला बळी पडत असाल, तर नॉन-स्टिक भांडी हे त्याचे कारण असू शकते. म्हणजेच स्वयंपाकघरातील तुमचा सर्वात चांगला मित्र हा तुमच्या आरोग्याचा सर्वात मोठा शत्रू आहे.

या आजारांची भीतीसतत बराच वेळ शिजवल्याने किंवा स्टीलचा चमचा वापरल्याने भांड्याच्या वरच्या थराला ओरखडे पडतात. अशा भांड्यात अन्न शिजविणे आणखी वाईट आहे. त्यातून निघणाऱ्या धुरामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. ज्या घरांमध्ये अन्न नॉन-स्टिकमध्ये शिजवले जाते. तेथे फ्लूची लक्षणे सामान्य आहेत. या भांड्यांमधून येणाऱ्या सततच्या धुरामुळे गरोदर महिलांच्या गर्भाच्या मेंदूला कायमचे नुकसान होऊ शकते. महिलांमध्ये थायरॉईडचे प्रमाण कमी होते. या भांड्यांचा सतत वापर केल्याने स्वादुपिंडाचा म्हणजेच पॅनक्रियाचा कर्करोग आणि लिव्हरचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. ज्या भांड्यांचा कोट खरचटला आहे अशा भांड्यांमध्ये खाल्ल्यास कोलायटिस होण्याचा धोका असतो.

नॉनस्टिक कूकवेअरमध्ये शिजवलेले अन्न खाल्ल्यानेही रसायने शरीरात जातात. ते सहजासहजी सुटत नाहीत. संशोधनात असे म्हटले आहे की, या भांड्यांमध्ये शिजवलेले अन्न खाणे आपण जरी पूर्णपणे सोडले, तरी ही जिद्दी रसायने शरीरातून बाहेर पडण्यासाठी सुमारे चार वर्षे लागू शकतात. मात्र योग्य खबरदारी घेतल्यास नुकसानीचा धोका थोडा कमी होऊ शकतो.

नॉनस्टिक भांड्यात अन्न शिजवताना अशी घ्या काळजी

- सर्वप्रथम, नॉन स्टिक ऐवजी साध्या भांड्यात अन्न शिजवण्याचा प्रयत्न करा.

- खरेदी केल्यानंतर कधीही नॉनस्टिक भांडी थेट वापरू नका. ते स्वच्छ दिसतात परंतु त्यांचा रासायनिक लेप अन्नाद्वारे आपल्या शरीरात पोहोचू शकतो. त्यांना कोमट पाण्याने धुवा आणि मग वापरा.

- भांडी वापरण्यासाठी, एक वेगळा लाकडी चमचा घ्या. स्टीलच्या चमचा चालवल्यास त्यांचा वरचा थर काढून टाकला जातो आणि हानिकारक पदार्थ थेट आपल्या पोटात पोहोचतात.

- भांड्यांच्या कोटिंगची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामध्ये स्वयंपाक केल्यानंतर भांडी सिंकमध्ये ठेवण्याऐवजी हाताने धुवावीत. यामुळे ते दीर्घकाळ टिकतात.

- भांड्यांसह वापरलेला लाकडी चमचा पाण्यात भिजवून ठेवू नका. यामुळे ते लवकर खराब होतात. त्यांना एकत्र धुवा आणि बाजूला ठेवा.

- काही वेळा स्वयंपाक करताना भांड्याला काहीतरी चिकटते. त्यांना स्टीलच्या वस्तूने घासून काढू नका, कारण यामुळे नॉनस्टिक लगेच खराब होऊ शकते.

- नॉनस्टिक भांड्यांना आयुष्यमान असते. जर त्यांचे कोटिंग निघत असेल तर ही भांडी ताबडतोब बदलावीत. जुन्या जीर्ण भांड्यांमध्ये स्वयंपाक केल्याने चांगल्या भांड्यांपेक्षा जास्त नुकसान होते.

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स