शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

'या' लोकांनी जाभूंळ शिवूही नये, आहेत इतके दुष्परिणाम की आयुष्यात जांभूळ खाणं विसरून जाल..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 11:15 IST

जांभूळ औषध म्हणून वापरलं जातं. परंतु आपल्याला माहिती आहे का? काही लोकांसाठी जांभूळ हानिकारक असतं. अशा लोकांनी जांभळाचं सेवन करू नये.

आपल्यापैकी अनेकांना जांभूळ खायला आवडतं. शिवाय जांभूळ हे आरोग्यासाठी अत्यंत उत्तम असतं. मुख्य म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जांभूळ फार उपयोगी ठरतं. अशक्तपणा दूर करण्यासाठी या फळाचा वापर केला जाऊ शकतो. मात्र अति प्रमाणात जांभूळाचं सेवन करणं आरोग्यावर परिणाम करतं. आयुर्वेदानुसार जांभूळ औषध म्हणून वापरलं जातं. परंतु आपल्याला माहिती आहे का? काही लोकांसाठी जांभूळ हानिकारक असतं. अशा लोकांनी जांभळाचं सेवन करू नये.

बद्धकोष्ठताजांभळामध्ये सी व्हिटॅमिनचं प्रमाण भरपूर असतं. यामुळे तुमची रोग प्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते. शिवाय फायबरची मात्रा चांगली असते. परंतु जास्त सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे ते मर्यादित प्रमाणातच खावेत.

चेहऱ्यावर पुरळ येणंजर तुमची त्वचा ऑयली म्हणजे तेलकट असेल आणि पुरळ येण्याची समस्या असेल तर आपण जांभळाचं सेवन करणं टाळावं. जांभूळ खाल्ल्यामुळे पुरळ येण्याची समस्या वाढू शकते. त्यामुळे त्याचे अधिक सेवन करणं आरोग्यास हानिकारक आहे.

उलट्याजांभूळ खाल्ल्यानंतर बर्‍याच लोकांना उलट्यांचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरुवातीला २ ते ३ जांभूळ खा. जर तुम्हाला ते पचले तरच त्याचे सेवन करा.

ब्लड शुगरआयुर्वेदात ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी जांभळाच्या बियांची पावडर तसंच जांभूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र अनेकदा लोकं आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात याचं सेवन करतात. त्यामुळे ब्लड शुगर वाढण्याचा धोका उद्भवू शकतो.

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfruitsफळे