अभिनेता सिध्दार्थ जाधवला मात्र व्हॉटसअॅपचे वेड नाही.
सिध्दार्थने केले व्हॉटसअॅप बंद
/>आजकालच्या सोशलमिडीयाच्या जगात व्हॉटसअॅपने प्रत्येकाला वेड लावून ठेवले आहे. जो तो मोबाईलवर व्हॉटसअॅपमध्ये बिझी असतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यत व्हॉटसअॅप एके व्हॉटसअॅप. आजची तरूणाई तर व्हॉटसअॅप है तो सबकुछ है.अशाच अॅटीटयूडमध्ये जगत असतात.पण या व्हॉटसअॅपच्या दुनियेत विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता सिध्दार्थ जाधवला मात्र व्हॉटसअॅपचे वेड नाही. याबाबत लोकमत सीएनएक्सशी बोलताना सिध्दांर्थ म्हणाला, व्हॉटसअॅप ही माझ्यासाठी एक अनावश्यक व वेळ खाऊ गोष्ट आहे. व्हॉटसअॅपमुळे व्यक्तींमधील संवाद कमी झाला आहे. व्हॉटसअॅपमुळे माणूस स्वत:ला व नात्यांनादेखील हरवत चालला आहे.त्यामुळे गेली एक ते दीड वर्ष झाले माझे व्हॉटस अॅप मी बंद करून ठेवले आहे.