SHOCKING : सेल्फी काढल्याने होतो ‘सेल्फाइटिस’ विकार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2017 16:11 IST2017-02-18T10:41:04+5:302017-02-18T16:11:04+5:30

पुन्हा-पुन्हा सेल्फी काढण्याची सवय म्हणजेच ‘मेंटल डिसआॅर्डर’ होय. या मनोविकाराला ‘सेल्फाइटिस’ असं नाव देखील देण्यात आलं आहे.

SHOCKING: Selfiectomy occurs due to self-removal | SHOCKING : सेल्फी काढल्याने होतो ‘सेल्फाइटिस’ विकार !

SHOCKING : सेल्फी काढल्याने होतो ‘सेल्फाइटिस’ विकार !

वसेंदिवस स्मार्टफोनचा वापर वाढत असून स्मार्टफोनच्या वापराने वेगवेगळे विकारही उद्भवत आहेत. स्मार्टफोनच्या वापराने शरीरावर अनेक विपरित परिणाम दिसून येत आहेत. त्यातीलच एक म्हणजे ‘सेल्फाइटिस’ विकार होय. 

बऱ्याचजणांना कोठेही सेल्फी काढण्याची सवय जडली आहे. मात्र आपणास असलेली सेल्फी काढण्याची सवय तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकते, हे संशोधनातुन स्पष्ट झाले आहे. 
अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशनच्या मते, पुन्हा-पुन्हा सेल्फी काढण्याची सवय म्हणजेच ‘मेंटल डिसआॅर्डर’ होय. म्हणजेच एक मनोविकार असल्याचं म्हटलं आहे. या मनोविकाराला ‘सेल्फाइटिस’ असं नाव देखील देण्यात आलं आहे. 

ही सवय प्रामुख्याने तरुणाईमध्ये पाहावयास मिळते. सायकॉलोजिस्ट सांगतात की, मेट्रो सिटीजमध्ये देखील सेल्फीचा विकार वाढला आहे. यामध्ये जवळपास ६० टक्के तरुणींचा समावेश आहे. कुठलाही प्रसंग असो, तरुणाई सेल्फीसाठी सज्जच असते. मात्र ही सवय पुढे जाऊन धोकादायक ठरु शकते. 

Web Title: SHOCKING: Selfiectomy occurs due to self-removal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.