शरद पवार, सुशीलकुमार शिंदे मराठी चित्रपटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 04:07 IST2016-02-25T11:03:50+5:302016-02-25T04:07:17+5:30
राजकारणातील दोन हिरो आता, मराठी चित्रपटात झळकणार आहे.

शरद पवार, सुशीलकुमार शिंदे मराठी चित्रपटात
र जकारणातील दोन हिरो आता, मराठी चित्रपटात झळकणार आहे. आश्चर्य वाटले ना,पण ही गोष्ट अगदी खरं आहे. शरद पवार व सुशाीलकुमार शिंदे हे राजकारणातील दोन महाराष्ट्राचे लाडके नेते लेखक रामदास फुटाणे दिग्दर्शित ''सरपंच भागीरथ''! या मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात आरक्षणाचा मोठा प्रश्न कल्पकतेने हाताळला आहे. तसेच या चित्रपटात सरपंचाच्या माध्यमातून जातीच्या राजकारणाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत लोकमत सीएनएक्सने दिग्दर्शक रामदास फुटाणे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, आपल्या देशात आरक्षण हा खूप मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आरक्षणच्या मुद्दयावर या दोन राजकीय नेत्यांनी ''सरपंच भगीरथ''! या चित्रपटात आपले विचार मांडले आहे.प्रत्येकी दोन मिनिटाचे हे शुट आहे.