शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
3
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
4
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
5
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
6
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
7
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
8
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
9
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
10
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
11
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
12
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
13
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
14
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
15
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
16
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
17
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
18
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
19
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
20
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी

Shane Warne Heart Attack : पुरूषांना हार्ट अटॅकचा धोका जास्त का असतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 11:35 IST

Shane Warne Heart Attack : महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये हार्ट अटॅकचा धोका जास्त राहतो. यूएस सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोल अॅन्ड प्रीव्हेंशनच्या एका रिपोर्टनुसार, हृदयरोगांमुळे दरवर्षी सर्वात जास्त मृत्यू होतात.

ऑस्ट्रेलियाची महान लेग स्पिनर शेन वॉर्नचं (Shane Warne) हार्ट अटॅकमुळे (Heart Attack) वयाच्या ५२ व्या वर्षीय निधन झालं. शेन वॉर्नच्या अचानक झालेल्या निधनामुळे क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. कमी वयातच हार्ट अटॅकमुळे मृत्यू होण्याचं प्रमाण वाढत आहे. ही समस्या पुरूाषांमध्ये जास्त बघायला मिळते. एका रिपोर्टनुसार, महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये हार्ट अटॅकचा धोका जास्त राहतो. यूएस सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोल अॅन्ड प्रीव्हेंशनच्या एका रिपोर्टनुसार, हृदयरोगांमुळे दरवर्षी सर्वात जास्त मृत्यू होतात.

अमेरिकेत दरवर्षी साधारण ७ लाख ३५ हजार लोक हार्ट अटॅकचे शिकार होतात. साधारण सव्वा ५ लाख लोकांचा हार्ट अटॅकसोबत पहिल्यांदा सामना होतो. अमेरिकन हार्ट असोसिएशनचा दावा आहे की, महिलांच्या तुलनेत पुरूषांना हार्ट अटॅकचा धोका जास्त राहतो. वर्ष २०१६ मध्ये जामा इंटरनल मेडिसिनमध्ये प्रकाशित नॉर्वेच्या ट्रोम्सो स्टडीनुसार, वयाच्या काही खास टप्प्यांवर पुरूषांना हार्ट अटॅकचा धोका महिलांच्या तुलनेत दुप्पट असतो.

याचा शोध लावण्यासाठी वैज्ञानिकांनी साधारण ३४ हजार पुरूष-महिलांची हेल्ट मॉनिटर केली. सोबतच १९७९ ते २०१२ पर्यंत हार्ट अटॅकचा अनुभव करणाऱ्या साधारण २ हजार ८०० लोकांवरही नजर ठेवली. कोलेस्ट्रॉल लेव्हल, हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस, हाय बॉडी मास इंडेक्स आणि फिजिकल अॅक्टिविटीवर लक्ष ठेवल्यानंतर वैज्ञानिकांना असं आढळलं की, धोक्याचही ही वेगवेगळी कारणं हार्ट अटॅकमध्ये मोठ्या जेंडर गॅपची माहिती देत नाहीत. तर मग काय कारण आहे की, महिलांच्या तुलनेत पुरूषांना हार्ट अटॅकचा धोका जास्त राहतो?

महिलांना धोका कमी का?

जॉन होपकिंस सिकारॉन सेंटर फॉर दि प्रीव्हेंशन ऑफ हार्ट डिजीजचे क्लीनिकल रिसर्च डायरेक्टर मायकल जोसेफ ब्लाहा म्हणाले की, महिलांच्या तुलनेत पुरूषांना साधारण १० वर्षाआधी हार्ट अटॅकचा अनुभव येतो. एक्सपर्ट सांगतात की, पुरूषांमध्ये हार्ट अटॅकचा धोका ४५ वयानंतर वाढतो. तर महिलांमध्ये हाच धोका ५५ वयानंतर वाढण्याची शक्यता असते. मेनोपॉजआधी महिलांचा एथेरोस्क्लेरोसिसमुळे जास्त बचाव होतो. एथेरोस्क्लेरोसिस एक अशी कंडीनशन आहे जेव्हा धमण्यांमध्ये प्लेक डिपॉझिट जमा झाल्याने हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

मेनोपॉजनंतर होतो बदल

क्लीवलॅंड क्लीनिकनुसार, मेनोपॉजनंतर महिलांमध्ये एस्ट्रोजन हार्मोनचं प्रमाण कमी होणं सुरू होतं. एक्सपर्ट सांगतात की, हाय प्री-मेनोपॉजल एस्ट्रोजन लेव्हलमुळेही महिलांचा हार्ट अटॅकपासून बचाव होतो. हेच कारण आहे की, पुरूषांप्रमाणे महिला ४५ वयात हार्ट अटॅकच्या शिकार होत नाहीत. मात्र, ट्रोम्सो स्टडीमध्ये एस्ट्रोजनच्या स्टोरीला सपोर्ट करणारे पुरावे सापडले नाहीत. अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, मेनोपॉज सुरू झाल्यानंतरही महिलांना हार्ट अटॅकचा धोका पुरूषांच्या तुलनेत कमी होतो.

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाShane warneशेन वॉर्नHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स