SEXUAL HEALTH : ‘सेक्स हार्मोन’ इंजेक्शनने मुली कमी वयातच दिसतात आकर्षक !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2017 13:00 IST
या इंजेक्शनने मुलींच्या छातीचा आकार वाढतो. त्यांच्या कमरेत लचक वाढण्याबरोबरच चेहऱ्यावरील केस कमी होतात. यामुळे त्या कमी वयातच आकर्षक दिसायला लागतात.
SEXUAL HEALTH : ‘सेक्स हार्मोन’ इंजेक्शनने मुली कमी वयातच दिसतात आकर्षक !
-Ravindra Moreआपण तरुण आणि सुंदर दिसावे असे प्रत्येक मुलीला वाटते. यासाठी त्या खूप काही प्रयत्न करतात. मेकअप तर करतातच शिवाय सर्जरीपर्यंत मजल मारतात. मात्र आता ‘सेक्स हार्मोन’ हे असे इंजेक्शन आले आहे, ज्यामुळे मुली कमी वयातच तरुण आणि आकर्षक दिसू शकतात. कमी वयातच मुली दिसतात आकर्षक सेक्स हार्मोन इंजेक्शनचा वापर तेव्हाच केला जातो, जेव्हा १६ वर्षानंतर मुलीच्या शरीराचा विकास थांबतो. मात्र या इंजेक्शनचा जास्त वापर केल्याने साइड इफेक्टचाही धोका असतो. यासोबतच या इंजेक्शनचा वापर काही लोक चुकीचा वापरही करताना दिसत आहेत. रेड लाइट एरियात कमी वयाच्या मुलींना तरुण बनविण्यासाठी सेक्स हार्मोन इंजेक्शनचा वापर केला जात आहे. या इंजेक्शनने मुलींच्या छातीचा आकार वाढतो. त्यांच्या कमरेत लचक वाढण्याबरोबरच चेहऱ्यावरील केस कमी होतात. यामुळे त्या कमी वयातच आकर्षक दिसायला लागतात. शरीराच्या अवयवांचा विकास करते सेक्स हार्मोन इंजेक्शन एका प्रोफेसरच्या मतानुसार, शारीरिक व्याधींना दूर करण्यासाठी सेक्स हार्मोन इंजेक्शनचा वापर डॉक्टर करतात. याचा वापर ज्या मुलींचे वय १६ वर्ष असेल त्यांच्यावरच केला जातो. ज्या मुलींमध्ये नैसर्गिकरित्या हे हार्माेन बनत नसेल आणि त्यामुळे तिच्या शरीराच्या त्या अवयवांचा विकास खुंटला असेल अशा मुलींना या इंजेक्शनाद्वारे त्यांच्या त्या अवयवांचा विकास केला जातो. सेक्स हार्माेन इंजेक्शनचे साइड इफेक्टहे इंजेक्शन जास्त प्रमाणात घेतल्याने मुलींचे शरीर कमकुवत होऊ लागते आणि हाडेदेखील ढिसुळ होऊ लागतात. पूर्ण शरीर बेडौल होते शिवाय मानसिक आजाराची मोठी समस्या उद्भवते. शिवाय अवेळी वृद्धापकाळ तसेच वांझपणादेखील येऊ शकतो.