Sexual Health : ‘त्या’ क्षणांचा आनंद घेतााना शरीरात होतो ‘हा’ बदल !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2017 16:34 IST2017-04-25T11:04:32+5:302017-04-25T16:34:32+5:30
या क्षणांचा आनंद घेताना शरीरात असा कोणता बदल होतो ज्यामुळे आपल्या शरीरालाही आणि मनालाही हा आनंद वारंवार घ्यावासा वाटतो.
.jpg)
Sexual Health : ‘त्या’ क्षणांचा आनंद घेतााना शरीरात होतो ‘हा’ बदल !
आयुष्यात शारीरिक आणि मानसिक सुखासाठी ‘सेक्स’ खूप महत्त्वाचा आहे. या क्षणांचा आनंद घेताना शरीरात असा कोणता बदल होतो ज्यामुळे आपल्या शरीरालाही आणि मनालाही हा आनंद वारंवार घ्यावासा वाटतो. आज आपण सेक्स करताना आपल्या शरीरात नेमके काय होते याबाबत जाणून घेऊया.
* यावेळी सुरवातीच्या काळात तुमच्या शरीरात ‘सेरोटोनीन’चा स्त्राव होतो व तुम्हाला आनंदी वाटू लागते. हृद्याचे ठोके वाढतात व जननेंद्रियांना होणारा रक्तपुरवठा अधिक प्रवाहीत होतो. यामुळे पुरूषांमध्ये शिश्नाची ताठरता होते तर स्त्रियांमध्ये योनिलिंगाची ताठरता होते. ‘डोपामिन’चा शरीरातील स्त्राव वाढतो व सेक्स करण्याची अधिक इच्छा निर्माण होण्यास मदत होते.
* सेक्सच्या पुढच्या टप्प्यांत तुमच्या हृदयाचे ठोके वाढतात, तुम्ही सतत श्वास घेतात व तुमची जननेंद्रिय अधिक संवेदनशील बनतात.
* आॅर्गेझम हा सेक्स दरम्यानचा अगदी परमोच्च संभोगसुखाचा काळ. या दरम्यान शरीरातील स्नायू आकुंचन पावतात व सारा सेक्शुयल ताण निघून जाण्यास मदत होते. या दरम्यान पुरूषांच्या शरीरातून वीर्य बाहेर पडते तर स्त्रियांमध्ये आॅर्गेझममुळे शारिरीक सुख मिळते.
* सेक्सच्या अंतिम टप्प्यात, हृदयाचे ठोके, श्वसनाची गती पुन्हा सामान्य रूपात येते. शरीर आरामदायी होत असताना, शिश्न व योनिलिंग पुन्हा सामान्यरुपात येते. या वेळेत स्त्रियांना त्याच्या साथीदारासोबत कुशीत राहणे अधिक आवडते.