SEXUAL HEALTH : संपूर्ण शारीरिक सुखासाठी खा ‘हे’ सुपरफूड !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2017 16:06 IST2017-03-22T10:36:46+5:302017-03-22T16:06:46+5:30
कामेच्छा वाढविण्यासाठी बहुतांश लोकं नको तो पर्याय अवलंबतात, मात्र पदरी पडते ती निराशा. जाणून घ्या कामेच्छा वाढविण्यासाठीचे १० सुपरफूडविषयी माहिती...

SEXUAL HEALTH : संपूर्ण शारीरिक सुखासाठी खा ‘हे’ सुपरफूड !
असे म्हटले जाते की, ज्यांचे सेक्स लाइफ आनंदी त्यांचे जीवनही आनंदी. मग हा आनंद मिळविण्यासाठी म्हणजेच कामेच्छा वाढविण्यासाठी बहुतांश लोकं नको तो पर्याय अवलंबतात, मात्र पदरी पडते ती निराशा. आज आम्ही आपणास कामेच्छा वाढविण्यासाठीचे १० सुपरफूडविषयी माहिती देणार आहोत, ज्यामुळे सहजपणे तुमचा सेक्सी मूड बनेल.
* स्ट्रॉबेरी
सेक्सी मूड बनविण्यासाठी प्रेमाच्या लाल रंगात रंगलेली सुंदर स्ट्रॉबेरी एक उत्तम फूड आहे. अशाप्रसंगी स्ट्रॉबेरीचे सेवन नक्कीच करावे.
* केशर
केशर गरम पाण्यामध्ये १५ मिनिट भिजवून ठेवा आणि त्यानंतर हे तांदळासोबत खावे. यामुळे महिलांमधील कामेच्छा वाढवण्या मदत होते.
* अॅवकोडा
व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी6, पोटॅशियम आणि अँटीआॅक्सीडेंटने भरपूर हे फळ तुमच्या हृदयाचे रक्षण तसेच सुरळीत रक्तप्रवाहसोबतच सेक्स लाइफलासुद्धा उत्तम बनवते.
* डाळिंब
एका संशोधनानुसार डाळिंबाचे फळ किंवा डाळिंबाचे ज्यूस नियमित सेवन केल्याने सेक्स पॉवर दुपटीने वाढते.
* बदाम
बदामामध्ये झिंक, सेलेनियम आणि व्हिटॅमिन ई सोबतच सेक्शुअल हेल्थ आणि उत्तम सेक्स लाइफसाठी आवश्यक असलेले इतर पोषक तत्व असतात.
* रताळे
चवीसाठी रताळे जेवढे चांगले असतात तेवढेच तुमच्या सेक्स लाइफसाठीसुद्धा उत्तम ठरतात.
* तीळ
तिळामध्ये उपस्थित झिंक सेक्स लाइफसाठी उत्तम पोषक तत्व आहे. यासोबतच हे टेस्टोस्टेरॉनला उत्प्रेरीत करून पुरुषांमध्ये शुक्राणूची वृद्धी करण्यास मदत करतात.
* टरबूज
गरमीच्या दिवसांमध्ये उपलब्ध होणारे थंड, गोड टरबूज कामेच्छा वाढवणाऱ्या फायटोन्यूट्रीएन्ट्सने भरलेले असते आणि तुमच्या सेक्स लाइफला उत्तम बनवण्यातही सहायक ठरते.
* लसूण
लसणामुळे पदार्थांची चव वाढण्यास तर मदत होतेच त्याच बरोबर यामुळे प्रणय लाईफमध्येदेखील उत्तम वाढ होते.
* खडीसाखर
आयुवेर्दानुसार शरीरासाठी आणि प्रणयक्रीडेतील सुखासाठी खडीसाखर उत्तम असल्याचे सांगण्यात आले आहे.