SEXUAL HEALTH : ​पुरुषत्व वाढवायचयं? तर ‘ही’ दाळ खा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2017 15:34 IST2017-02-16T10:04:40+5:302017-02-16T15:34:40+5:30

ज्या पुरुषांमध्ये स्मर्प काउंट कमी आहेत त्यांनी रोज या दाळीचे सेवन करावे. यातील फॉस्फरस, कॅल्शियम, लोह, अ‍ॅमिनो अ‍ॅसिड शरीरात स्पर्म काउंट वाढविते.

SEXUAL HEALTH: Do you want to increase masculinity? So eat 'this' pulse! | SEXUAL HEALTH : ​पुरुषत्व वाढवायचयं? तर ‘ही’ दाळ खा !

SEXUAL HEALTH : ​पुरुषत्व वाढवायचयं? तर ‘ही’ दाळ खा !

ong>-Ravindra More

कुळीथ दाळीचे अनेक फायदे आहेत. या दाळीत पोषकत्त्व भरपूर प्रमाणात असून आयुर्वेदात सर्व ठिकाणी या दाळीचा वापर केला जातो. ही दाळ पचायलाही हलकी आहे. यापेक्षाही या दाळीचे अनेक फायदेही आहेत. ते जाणून घेऊया. 



* ज्या पुरुषांमध्ये स्मर्प काउंट कमी आहेत त्यांनी रोज या दाळीचे सेवन करावे. यातील फॉस्फरस, कॅल्शियम, लोह, अ‍ॅमिनो अ‍ॅसिड शरीरात स्पर्म काउंट वाढविते.

* महिलांना मासिक पाळीदरम्यान या दाळीचे सेवन करावे. कारण या दरम्यान होणारी ब्लीडिंग थांबते आणि ज्या महिलांना अनियमित पीरियडची समस्या असते, त्यांनाही या दाळीच्या सेवनाने फायदा होतो. 

* सर्दी आणि हिवतापात या दाळीचे सूप पिल्याने फायदा होतो. ही दाळीच्या सेवनाने नाक मोकळे होते ज्यामुळे श्वास घ्यायला सोपे होते. सोबतच शरीराची रोगप्रतिकार शक्तीदेखील वाढते. 

* पचनशक्ती वाढविण्यासाठी ही दाळ खूपच उपयुक्त आहे. जर पोटात गॅस होत असतील तर या दाळीचे सेवन करावे. 

* मधुमेह रुग्णांसाठी ही दाळ रामबाण उपाय आहे. रोज या दाळीच्या सेवनाने रक्तातील शर्कराचे प्रमाण संतुलित राहते. 

* या दाळीत फायबर भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे आम्लपित्त, अजिर्ण आदी समस्यांवर फायदेशिर ठरते. 

* या दाळीत विटॅमिन ए असल्याने किडनी स्टोनपासूनही मुक्तता होते. 

* कुळीथचे  अनेक फायदे आहेत, मात्र गरोदर, कुष्ठरोगी आणि ज्यांना वजन वाढवायचे आहे, अशांनी चुकूनही या दाळीचे सेवन करु नये.  

Web Title: SEXUAL HEALTH: Do you want to increase masculinity? So eat 'this' pulse!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.