शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

ICMR अन् सिरम इन्स्टिट्यूट कोरोना लसीवर एकत्र काम करणार; लवकरच यशस्वी लस येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2020 11:56 IST

CoronaVirus News & Latest Updates : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कंपनी नोवावॅक्सशीसुद्धा लसीसाठी टायअप केलं आहे. 

भारतात  २०२१ च्या पहिल्या  तीन महिन्यात कोरोना व्हायरसची लस उपलब्ध होऊ शकते अशी शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. आता अजून एक विदेशी लस चाचणीदरम्यान  ९० टक्क्यांपेक्षा जास्त परिणामकारक ठरत असल्याचे दिसून आले आहे.  कोविशिल्ड ही स्वदेशी लस  सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कडून  तयार करण्याचे काम सुरू आहे. इंडियन मेडिकल काऊंसिल ऑफ  रिसर्च (ICMR) च्या निरिक्षणाखाली या लसीच्या चाचण्या सुरू आहेत. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कंपनी नोवावॅक्सशीसुद्धा लसीसाठी टायअप केलं आहे. 

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदार पुनावाला यांनी मागच्या आढवड्यात सांगितले होते. की एक सुरक्षित आणि प्रभावी लस पुढच्या वर्षाच्या सुरूवातील उपलब्ध होईल. तर चाचणी यशस्वी ठरली आणि रेग्यूलेटरी अप्रुव्हल मिळाले तर जानेवारीमध्येच लस तयार होऊ शकते. भारतात फेज 2/3 चाचणीअंतर्गत हजारो  लोकांना कोविशील्डही लस दिली जाणार आहे.

सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पुनावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार लसीचे दीर्घकालीन परिणाम दिसण्यासाठी  दोन ते तीन वर्षाचा कालावधी  लागू शकतो. कोविशिल्ड लस लवकरात लवकर उपलब्ध व्हावी याासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. पूनावाला यांनी सांगितले की, लस ही स्वस्त दरात उपलब्ध होईल आणि सगळ्यांपर्यंत पोहोचेल. 

coronavirus: कोरोनाविरोधात यशस्वी ठरत असलेल्या Pfizer Vaccine ची भारतात असेल एवढी किंमत

 सीरम इन्स्टिट्यूटच्या  दूसऱ्या कोरोना लसीचे नाव कोवावॅक्स आहे. अमेरिकन बायोटेक फर्म Novavax सोबत मिळून ही लस विकसित करण्यात आली आहे. ही एक स्पाईक प्रोटीन लस असून सीरम इंन्स्टीट्यूट लाईफ सायंजेसने तयार केली आहे. रिपोर्ट्सनुसार Novavax कंपनीने ने सीरम इन्स्टिट्यूटसह २०२१ मध्ये एक बिलियन डोज पुरवण्याचा  करार केला आहे.  पुढच्या वर्षी कोरोना लसीचे लसीकरण करण्याच्या दृष्टीने पाऊलं उचलली जात आहेत. देशभरातील कोल्ड स्टोरेज चेन्स आणि वितरणावर  अधिक भर दिला जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रायलयाने दिलेल्या माहितीनुसार २५ ते ३० कोटी भारतीयांना लस देण्याची तयारी केली जात आहे. याची प्रायोरिटी लिस्ट सुद्धा तयार करण्यात आली आहे.

 आनंदाची बातमी! रशियन कंपनीची स्पुटनिक -व्ही कोरोना लस ९२ टक्के ठरली प्रभावी 

दरम्यान  कोरोनावरील लस ही प्राधान्याने फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या आराेग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात जिल्हा पातळीवर खासगी व सरकारी सेवेतील आराेग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. ही सर्व माहिती लवकरच राज्य शासन निर्मित एका विशेष ॲपमध्ये संकलित करण्यात येईल. या ॲपचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आराेग्य विभागाने दिली.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात हे ॲप येणार असून यात जिल्हा पातळीवरून माहिती अपलोड करण्यात येईल. या ॲपमध्ये लसीचा डोस, पुन्हा देण्यात येणारा डोस आणि लसीचे वेळापत्रक असेल. ॲपमध्ये संकलित करण्यात येणाऱ्या सर्व माहितीची उपलब्धता केंद्र सरकारकडेही असेल. ॲप अखेरच्या कोडिंग टप्प्यात आहे. लवकरच ते कार्यान्वित करण्यात येईल.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या