सेल्फी काढताय? हा अभ्यास वाचा. अभ्यास म्हणतो ‘सेल्फी म्हणजे फक्त गंमत नव्हे, सेल्फीचा सिरियसली विचार व्हायला हवा!’
By Admin | Updated: June 30, 2017 17:48 IST2017-06-30T17:48:58+5:302017-06-30T17:48:58+5:30
गॉर्जिया इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या संशोधकांनी केला सेल्फीजचा अभ्यास आणि काही महत्त्वाचे निष्कर्ष जगासमोर आणले

सेल्फी काढताय? हा अभ्यास वाचा. अभ्यास म्हणतो ‘सेल्फी म्हणजे फक्त गंमत नव्हे, सेल्फीचा सिरियसली विचार व्हायला हवा!’
- सारिका पूरकर-गुजराथी
काही दिवसांपूर्वी आपण म्हणत होतो की माणूस आता मोबाईलशिवाय जगण्याची कल्पनाही करू शकत नाही. पण आता माणूस सेल्फीशिवाय जगू शकत नाही, असं म्हणण्याची वेळ आली आहे. स्मार्ट फोनमधील फ्रंट कॅमेऱ्यामुळे सेल्फीनं फोटोग्राफीच्या विश्वात क्रांतीच घडवून आणली आहे...सोशल मीडिया, इन्स्ट्राग्राम, व्हॉॅट्सअॅप प्रोफाईल्स यावर या सेल्फीजनी केव्हाच कब्जा केला आहे. ‘सेल्फी विथ’ मग ती कशाबरोबरही काढली जातेय...सर्वात उंच, धोकादायक टॉवर वर केलेली चढाई असो अथवा चित्रविचित्र वेशभूषा किंवा मग गरोदरपणातील नऊ महिन्यांचा अनुभव.सगळ्यासाठी आणि सगळ्यांसमवेत सेल्फी काढली जातेय.
सेल्फीजच्या दुनियेत हजारो आविष्कार सध्या बघायला मिळत आहेत. तर अशा या सेल्फीजच्या माध्यमातून लोकं स्वत:ची ओळख कशी करुन देत आहेत, ते काय सांगताय या सेल्फीजमधून हे जाणून घेण्याचा प्रयत्न गॉर्जिया इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या संशोधकांनी केला. त्याकरिता त्यांनी इन्स्ट्राग्रामवर पोस्ट केलेल्या २.५ दशलक्ष सेल्फीजचा अभ्यास केला.
* यासंदर्भात प्रसिद्ध लेखिका ज्युलिया डीब- स्विहार्ट यांनी म्हटलंय की सेल्फी खरं तर माणसाच्या व्यक्तिमत्वाची मांडणी करणारी कलाकृती असते. म्हणूनच ती अत्यंत काळजीपूर्वक, कल्पकतेनं साकारायला हवी. सोशल मीडियावर सेल्फीजच्या माध्यमातून लोकं त्यांची संपत्ती, आरोग्य आणि शारीरिक सुंदरता प्रदर्शित करुन त्यांचे व्यक्तिमत्व सादर करतात. सेल्फीतून तुम्ही कसे आहात हे तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करतात तर बघणारा तुम्ही कसे आहात हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो.
* इर्व्हिंग गॉफमन यांनी ‘सेल्फ इन एव्हरीडे’ लाईफ या पुस्तकात हाच विचार मांडला होता. आपण जे कपडे घालतो, समाजात जसे आपण वावरत असतो हे खरं तर आपणही हुशार आहोत, सुंदर आहोत हे सांगण्याचीच धडपड असते. त्यामुळे सेल्फी देखील तुमचे आॅनलाईन आणि आॅफलाईन व्यक्तिमत्वाची घुसळण असते. तुमच्या आयुष्यातील सत्य काय आहे? हे सिद्ध करण्याचा किंवा लोकांनी हे सत्य आहे यावर विश्वास ठेवावा असं सांगण्याचा तो एक मार्ग आहे असंही ज्युलिया यांनी या अभ्यासात म्हटलय.