शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना सतावतायत 'हे' आजार....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 18:33 IST

कोरोना झाल्यानंतर अनेकांना अनेक पोस्ट कोव्हिड आजारांना सामोरे जावे लागले. त्यात अनेक प्रकारचे शारीरीरीक व मानसिक आजाराही आहेत. काही जणांना थकवा, आधी असलेल्या आजारांमुळे त्रास इत्यादी जाणवता. तर काही जणांमध्ये नवीन आजाराची लक्षणे दिसून येतात.

कोरोना झाल्यानंतर अनेकांना अनेक पोस्ट कोव्हिड आजारांना सामोरे जावे लागले. त्यात अनेक प्रकारचे शारीरीरीक व मानसिक आजाराही आहेत. काही जणांना थकवा, आधी असलेल्या आजारांमुळे त्रास इत्यादी जाणवता. तर काही जणांमध्ये नवीन आजाराची लक्षणे दिसून येतात.  असाच कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत कोरोना झाल्यानंतर सतावणारा आजार म्हणजे डिप्रेशन आणि एंजायटी. सामाजिक न्याय मंत्रालयाने दिलेल्या माहितीनूसार मेंटल हेल्ध हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करणाऱ्यांमध्ये पोस्ट कोविड डिप्रेशन आणि एंझायटीच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. यात केरळ, आंध्रप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि

हरियाणा सारख्या राज्यातून येणाऱ्या कॉल्समध्ये वाढ झाल्याचेही सामाजिक न्याय मंत्रालयाद्वारे सांगण्यात आले आहे.डिपार्टमेंट ऑफ एम्पावरमेंट ऑफ पर्सन विद डिसेबिलटीजच्या नुसार १६ सप्टेंबर २०२० ते ३० एप्रिल पर्यंत किरण हेल्पलाईनवरती एकुण २६ हजार ०४७ इतके कॉल्स आले. ज्यात मार्च महिन्यामध्ये कॉल्सची संख्या ३,६१७ होती. तर तीच सध्या एप्रिलमध्ये ३,३७१ इतकी कमी झाली होती. परंतू केरळ, आंध्रप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि हरियाणा आदी राज्यांमध्ये ही कॉल संख्या वाढलेली होती. ती मार्चमध्ये ७३ वरून एप्रिलमध्ये १७० या फरकाने वाढली होती.

हेल्पलाईन क्रमांकाचा प्रचारही या वाढलेल्या कॉल्सचे कारण असू शकतोहेल्पलाईनच्या रिजनल सेंटरच्या अधिकाऱ्याने एबीपी न्यूजच्या वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार कॉल करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक कोव्हिडच्या दुसऱ्या लाटे संदर्भात चिंता व्यक्त केली जात होती. अधिकाऱ्याच्या मते कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेत केल्या गेलेल्या मेंटल हेल्थ हेल्पलाईनच्या प्रचारामुळे हे कॉल्स वाढले असावेत. केलेल्या कॉल्समध्ये सर्वात जास्त तक्रारी या कोव्हिड-१९च्या सध्याच्या परिस्थीतीबाबत होत्या. तर, व्हॅक्सिनेशन, इमर्जन्सी सर्व्हिस याबातही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

मागील वर्षी सप्टेंबरमध्ये हेल्पलाईन सुरु करण्यात आली१८००-५९९-००१९ ही हेल्पलाईन मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सुरु करण्यात आली. कॉल करणाऱ्यांच्या तक्रारीनुसार मानसोपचारतज्ज्ञांकडे हा कॉल फॉरर्वड केला जात होता.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सMental Health Tipsमानसिक आरोग्य