शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची दुसरी लाट जीवघेणी नाही पण.......महाराष्ट्रातील तज्ज्ञांचा कोरोना संसर्गाबाबत खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 18:40 IST

CoronaVirus News & Latest Updates : मुंबईतल्या बीएमसी रुग्णालयांनी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोना वॉर्डमधील बेडची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला होता.

गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोनानं मान वर काढायला सुरूवात केली आहे. देशभरासह महाराष्ट्रात जास्तीत जास्त रुग्ण वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे लॉकडाऊन पुन्हा लागणार का? अशी भीती लोकांच्या मनात आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची ही प्रकरणं फार गंभीर नाहीत पण कोरोनाव्हायरस आता युरोपप्रमाणं वेगाने पसरतो आहे.टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार मुंबईतल्या बीएमसी रुग्णालयांनी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोना वॉर्डमधील बेडची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला होता. पण आता परिस्थिती पुन्हा बिघडते आहे. सध्या मुंबईतील रुग्णालयांतील सर्व कोविड वॉर्ड भरले आहेत. 

डॉ. प्रिन्स सुराना यांनी सांगितले की, ''फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आम्ही चेंबूरमधील रुग्णालयातील बेडची संख्या कमी करण्याचा विचार करत होतो. पण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सर्व बेड फूल झाले. आमचे ९ वेंटिलेटरदेखील फूल आहेत.'' आरोग्य विभागातील एपिडेमिओलॉजीचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितलं की, ''महाराष्ट्रातील कोरोनाची दुसरी लाट सध्या जास्त घातक नाही. पण यावेळी व्हायरस युरोपसारखा वेगाने पसरत आहे. महाराष्ट्रात 15 ते 21 फेब्रुवारीपर्यंत मृत्यू दर 0.7% होता. जो 15-20 मार्च या कालावधीत 0.32% झाला आहे. 15 फेब्रुवारीपासून आतापर्यंत कोरोना केसेस चौपट झाले आहेत, तर आठवड्याची प्रकरणं तिपटीने वाढली आहेत.''

दरम्यान  देशातील पाच राज्यांत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून, नवीन 80 टक्के रुग्णांची नाेंद झाली आहे.  देशातील सक्रिय रुग्ण वाढण्यामागे महाराष्ट्र, केरळ आणि पंजाब या राज्यातील रुग्णसंख्या कारणीभूत आहे. देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत या राज्यांतील रुग्णांचे प्रमाण 76.48 टक्के इतके आहे. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकारसह त्या - त्या ठिकाणचे राज्य सरकारही सतर्क झाले असून, त्यांनी कठोर निर्बंधांची प्रक्रिया हाती घेतली आहे. आता आणखी काळजी घ्यावी लागणार! किडनीवर हल्ला करतोय कोरोना व्हायरस; संशोधनातून मोठा खुलासा

देशात दैनंदिन रुग्णसंख्या वाढीस महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि छत्तीसगड या राज्यांतील संसर्ग कारणीभूत आहे. देशातील दैनंदिन रुग्णसंख्येत त्यांचे प्रमाण तब्बल ८०.६३ टक्के इतके आहे. राज्यात सलग दोन दिवस २५ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली, तर पंजाबमध्ये २ हजार ३६९, केरळमध्ये १ हजार ८९९ इतके रुग्ण आढळले. सध्या देशात २ लाख ७१ हजार २८२ रुग्ण उपचाराधीन आहेत. तब्बल ५ वर्ष माणसांच्या शरीरात लपून होता हा व्हायरस; आता पुन्हा वेगानं होतंय संक्रमण, ९ रूग्णांचा मृत्यू

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या