शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
3
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
4
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
5
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
6
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
7
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
8
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
9
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
10
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
11
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
12
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
13
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
14
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
15
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
16
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
17
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
18
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
19
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
20
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश

कंबरदुखी, पाठदुखी नको वाटतेय ? आहारातील 'या' गोष्टींमुळे नक्की फरक पडेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 12:36 IST

तासनतास ऑफिसमध्ये बसून काम केल्याने कंबरदुखी, पाठदुखी, मानेचे दुखणे यांसारख्या समस्या उद्भवतात. चुकीच्या पद्धतीने झोपणे, सततचे ड्रायव्हिंग यामुळे दुखणे अजुनच वाढते.

आजकालची जीवनशैली ही निव्वळ बसून काम करण्याची झाली आहे. तासनतास ऑफिसमध्ये बसून काम केल्याने कंबरदुखी, पाठदुखी, मानेचे दुखणे यांसारख्या समस्या उद्भवतात. चुकीच्या पद्धतीने झोपणे, सततचे ड्रायव्हिंग यामुळे दुखणे अजुनच वाढते. ज्या लोकांमध्ये  न्युट्रियंट्स आणि व्हिटॅमिनची कमतरता असते त्यांना या समस्येचा जास्त त्रास होतो. शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असल्यामुळे कंबर, पाठदुखी जाणवते. व्हिटॅमिन बी १२ शरीराला ऊर्जा देण्याचे काम करते. ज्यांच्यामध्ये याची कमतरता असते ते लवकर थकतात. त्यासाठी गरजेचे आहे ते म्हणजे पोषक आहार. 

वरील दुखणे तुम्हालाही होऊ नयं असे वाटत असेल तर डाएटमध्ये काही गोष्टी समाविष्ट करणे गरजेचे आहे.

हळदीचे दूध 

कोरोना च्या काळात प्रत्येक घरातील व्यक्ती हळदीचे दूध आवर्जुन घेत होती. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी हळदीचे दूध किती फायदेशीर आहे हे आपल्याला समजले. हळदीचे दूध स्नायुंच्या आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे. कंबरदुखी, पाठदुखी दूर करण्यासाठी रात्री झोपताना हळदीचे दूध प्यावे. एक ग्लास दुधात अर्धा चमचा हळद घालून ते प्या खूप फरक पडेल. 

हर्बल टी  

पाठदुखीने त्रस्त असलेल्या लोकांनी दुधाच्या चहाची सवय कमी करुन हर्बल टी घ्यायला हरकत नाही.हर्बल टी चे ही फायदे आयु्र्वेदात सांगितले आहेत. ग्रीन टी बनवून त्यात आल्याचे तुकडे घाला आणि उकळु द्या. या चहात अॅंटीइंफ्लामेटरी  प्रॉपर्टीज भरपुर प्रमाणात असतात. हर्बल टी प्यायल्याने प्रसन्नही वाटते. 

दुग्धजन्य पदार्थ

दूध,दही,ताक,लोणी हे पदार्थ शरीरासाठी खुपच आरोग्यदायी आहेत. यातुन व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता पूर्ण होते. मात्र हे पदार्थ खाताना काळजीही घेतली पाहिजे. वेळी अवेळी, अतिप्रमाणात याचे सेवन करु नये.

अंडी, मासे 

जे नॉनव्हेज खातात त्यांनी अंडी आणि मासे खाण्यास हरकत नाही. यामुळे शरीराला एनर्जी मिळते. व्हिटॅमिन्स ची कमतरता दूर होते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सBack painपाठीचे दुखणे उपायmilkदूधhospitalहॉस्पिटल