शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

शास्त्रज्ञांनी शोध लावला! एक अशी टेस्ट ज्यानं कॅन्सर, डायबेटीस आहे का? चटकन कळतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 16:05 IST

लाळ चाचणी किती सोपी असेल आणि यातून आजारांचा (Saliva test could detect many disease) शोध कसा घेतला जाईल, हे जाणून घेऊया.

आपल्या तोंडातील लाळ (Saliva) ही फार महत्त्वाची असते. आता याच लाळेच्या नमुन्यांमधून (Saliva Sample) आपल्या शरीराला कोणते रोग जडले आहेत, याचा शोध घेतला जाऊ शकतो. लाळेवर चाचणी करून डायबेटिस (Diabetes) ते कॅन्सरपर्यंतच्या (Cancer) सर्व आजारांचा शोध घेता येईल, असे संशोधकांनी म्हटलं आहे. यामुळे कमी वेळेत निदान करता येईल. मानवी लाळेमध्ये ७०० सूक्ष्म जीव, यूरिक अ‍ॅसिडसारखी संयुगं आणि अनेक रसायनं आढळतात. ज्यातून कोणता आजार जडला आहे, याचा शोध घेतला जाऊ शकतो, असं संशोधकांचं म्हणणं आहे. तर लाळ चाचणी किती सोपी असेल आणि यातून आजारांचा (Saliva test could detect many disease) शोध कसा घेतला जाईल, हे जाणून घेऊया.

डेलीमेलच्या वृत्तानुसार, लाळेतील युरिक अ‍ॅसिड आणि रोग यांच्यातील संबंधाचा संशोधकांनी शोध लावला आहे. जर शरीरात युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढली असेल तर ती इतर अनेक गोष्टींकडे इशारा करते. याचा अर्थ, रक्तदाब वाढू शकतो. तसेच युरिक अ‍ॅसिड वाढल्यानंतर हृदयविकार, किडनीचे आजार, कर्करोग, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणं, डायबेटिस आणि कर्करोगाचा देखील शोध घेतला जाऊ शकतो, असे युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेसचे प्रोफेसर दत्‍ता मेघ यांनी सांगितले.

काय असतं युरिक अ‍ॅसिड?तर सोप्या शब्दांत युरिक अ‍ॅसिड हे रक्तामध्ये आढळणारं रसायन असतं. प्युरीनयुक्त पदार्थांच्या पचन प्रक्रियेदरम्यान याची निर्मिती होते. मटार, पालक, मशरूम, सोयाबीन, डुकराचं मांस, चिकन, मासे, मटण, राजमा आणि बिअरमध्ये प्युरीन आढळतात. याचे सेवन केल्यानंतर शरीरात युरिक अ‍ॅसिड तयार होते आणि रक्तात मिसळते. तर उर्वरित किडनीच्या माध्यमातून शरीराबाहेर टाकले जाते. मात्र, शरीरात प्युरीनचे प्रमाण ठराविक प्रमाणापेक्षा अधिक झाल्यानंतर किडनीद्वारे फिल्टर होत नाही. परिणामी शरीरात युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते आणि समस्या निर्माण होतात.

बायोप्सी किंवा रक्त चाचणी करण्याऐवजी यूरिक अ‍ॅसिड टेस्ट केल्यास अनेक रोगांचा शोध घेतला जाऊ शकतो. तसेच वेळेआधीच येणारे झटकेही टाळता येतात, असे ब्रिस्टल युनिव्हर्सिटीचे कन्सल्टंट यूरोलॉजिस्ट प्रोफेसर राज प्रसाद यांनी सांगितले.

यापूर्वीदेखील अनेक संशोधन अहवालांतून युरिक अ‍ॅसिडचे धोके सांगण्यात आले होते. हायपरटेन्शन जर्नलमध्ये वर्ष 2018 ला एक संशोधन अहवाल प्रकाशित करण्यात आला होता. युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असलेल्या महिलांना रक्तदाबाचा धोका दुप्पट असतो. तर पुरुषांमध्ये हे प्रमाण ३७ टक्के होते, असे या अहवालात म्हटलं होतं. तर वर्ष २०२० मध्ये जर्नल ऑफ कॅन्सरमध्ये एक संशोधन अहवाल प्रकाशित झाला होता. शरीरात युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यानंतर कर्करोगाचा धोका देखील वाढतो. तसंच त्याचं प्रमाण जर अधिक असेल तर नैराश्य, चिंता, अल्झायमरचा धोका वाढतो. असं या अहवालात म्हटलं होतं.

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सdiabetesमधुमेहcancerकर्करोग