शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
4
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
5
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
6
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
7
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
8
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
9
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
10
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
11
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
12
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
13
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
14
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
15
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
16
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
17
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
18
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
19
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
20
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."

खुशखबर! लवकरच रशिया कोरोनाची दुसरी लस लॉन्च करणार; नोव्हेंबरपासून उत्पादनाला सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 16:59 IST

CoronaVirus News & Latest Updates : EpiVacCorona नावाच्या या लसीला वेक्टर स्टेट रिसर्च सेंटर ऑफ वायरोलॉजी एंड बायोटेक्नोलॉजीनं मिळून तयार केलं आहे. 

जगभरातून सगळ्यात आधी कोरोनाची लस तयार केलेल्या रशियानं अजून एक लस तयार करण्याचा दावा केला आहे. रशियाची ही लस सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार स्पुतनिक वी लस दिल्यानंतर लोकांमध्ये वेगवेगळ्याप्रकारचे साईड इफेक्ट्स दिसून आले होते. पण नवीन लस कोरोनाला रोखण्यासाठी परिणामकारक ठरेल असं सांगितले जात आहे. EpiVacCorona नावाच्या या लसीला वेक्टर स्टेट रिसर्च सेंटर ऑफ वायरोलॉजी एंड बायोटेक्नोलॉजीनं मिळून तयार केलं आहे. 

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार रशियाच्या दुसऱ्या लसीत ज्या औषधांचा वापर करण्यात आला आहे. अशा औषधांचा सिक्रेट प्लॅन मागवण्यात आला आहे. सप्टेंबरमध्ये या लसीच्या चाचण्या पूर्ण होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. या लसीची पहिली चाचणी ५७ स्वयंसेवकांवर करण्यात आली होती. वेक्टर स्टेट रिसर्च सेंटर ऑफ वायरोलॉजी एंड बायोटेक्नोलॉजीनं मिळून ही लस तयार केली आहे. ही जगातील दोन प्रमुख संस्थांनांपैकी एक ही संस्था आहे. या कंपनीकडे कांजण्या या आजाराच्या लसीचाही मोठा स्टॉक आहे. या लसीसाठी सायबेरियाच्या सोवियत बायोलॉजिकल वेपंस रिसर्च प्लांटमधून औषधं मागवण्यात आली आहेत.

तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार ज्या  रुग्णांवर लसीचे परिक्षण करण्यात आले. त्यांना २३ दिवस रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं.  त्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली. रोगप्रतिकारकशक्ती पाहणं हे तज्ज्ञांचे उद्दीष्ट होतं. १४ ते २१ दिवसात स्वयंसेवकांना लसीचे डोस देण्यात आले होते. सप्टेंबरमध्ये लसीच्या चाचण्या झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये रजिस्ट्रेशन केलं जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे. नोव्हेंबरमध्ये या लसीच्या उत्पादनाला सुरूवात होईल. आतापर्यंत या लसीचे कोणतेही साईड इफेक्ट्स दिसून आलेले नाहीत.

सोवियत बायोलॉजिकल वेपंस रिसर्च प्लांट आणि वेक्टर रिसर्च सेंटरनं मिळून आतापर्यंत कोरोनाच्या १३ लसींवर काम केले आहे. या लसींची प्राण्यांवर चाचणी झाली होती. वेक्टर रिसर्च सेंटरसोबत मिळून औदयोगिक स्तरावर कांजण्यांची लस तयार केली होती. मागिल काही वर्षात या संस्थानांनी मिळून ब्यूबोनिक प्लेग, इबोला, हेपेटाइटिस-बी, एचआईवी, सार्स तसंच कॅन्सरची एंटीडोज तयार केला आहे.

भारतातही रशियाची कोरोनावरील लस तयार होण्याची शक्यता

रशियाने तयार केलेली कोरोनावरील लस स्पूतनिक व्ही यासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी अनेक भारतीय कंपन्या सरसावल्या आहेत. भारतीय कंपन्यांनी रशियन संचालक गुंतवणूक निधी (आरडीआयएफ) यांच्यकडे  लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या क्लिनिकल चाचण्यांविषयी माहिती देण्यास सांगितले आहे.आरडीआयएफ रशियाची भांडवल पुरवठा करणारी कंपनी आहे.

याच कंपनीने कोरोना लस स्पूतनिक व्हीचे संशोधन आणि चाचणीसाठी वित्तसहाय्य केले आहे. आरडीआयएफला ही लस वितरण व निर्यात करण्याचा अधिकार आहे. ही लस जगातील पहिली नोंदणीकृत कोरोना लस आहे. जर आरडीआयएफसोबत भारतीय कंपन्यांची चर्चा सुरुच राहिली तर लस भारतात तयार होऊ शकते. ही लस निर्यात आणि देशात वापरली जाऊ शकते. मॉस्को येथील भारतीय दूतावासाच्या सूत्रांनी रशियन वृत्तसंस्था स्पूतनिकला ही माहिती दिली होती.

रशियन दूतावासातील सूत्रांनी सांगितले की, "भारतीय कंपन्या लस संदर्भात आरडीआयएफशी संपर्क साधत होते आणि या कंपन्यांनी फेज -१ आणि फेज -२ चाचणीसाठी तांत्रिक माहिती मागविली होती. या कालावधीत सरकारकडून आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर तिसर्‍या देशाला लसीच्या निर्यातीवर चर्चा झाली. याशिवाय, देशातील वापरासाठी लस निर्मितीवरही चर्चा झाली होती."

रशिया कोरोनाविरूद्ध लस रजिस्टर करणारा जगातील पहिला देश ठरला आहे. ही लस रशियाच्या मायक्रो बायोलॉजी रिसर्च सेंटर गमलयाने विकसित केली आहे. ही लस बुधवारी क्लिनिकल चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात गेली आहे. रशियामध्ये भारताचे राजदूत वेंकटेश वर्मा यांनी वृत्तसंस्था स्पूतनिकला सांगितलं होतं की, लस निर्मितीसंदर्भात आरडीआयएफ प्रमुख किरिल दिमित्रीव्ह यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. तसेच, यासंदर्भात सकारात्मक परिणाम दिसून येतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती.

हे पण वाचा-

जीवघेण्या कॅन्सरपासून बचावासाठी मुळ्याचं सेवन फायद्याचं; वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंडातील तज्ज्ञांचा दावा

दिलासादायक! ब्रेस्ट मिल्कने कोरोनापासून बचाव होणार; रुग्णांना दुधाचे आईस क्यूब दिले जाणार, तज्ज्ञांचा दावा

Coronavirus: कोरोना लस ७३ दिवसांत आणि मोफत शक्य नाही; सिरम इन्स्टिट्यूटचं स्पष्टीकरण

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याcorona virusकोरोना वायरस बातम्या