शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रुजुता दिवेकर सांगयात थंडीत हेल्दी राहण्याचं सिक्रेट, 'या' गोष्टींचा आहारात समावेश करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 16:37 IST

जर तुम्ही विचार करत असाल की, हिवाळ्याच्या काळात आहारात कोणते पदार्थ समाविष्ट करावेत, तर अलीकडेच सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांनी इंस्टाग्रामवर हिवाळ्यात आहारात समावेश कराव्यात अशा ५ गोष्टी शेअर केल्या आहेत.

हिवाळ्यात अनेक आरोग्यदायी आणि पौष्टिक अन्नपदार्थ उपलब्ध होतात. संपूर्ण बाजारपेठ हिरव्या भाज्यांनी सजते. यासोबतच गुळापासून तीळापर्यंत सर्व गरमागरम पदार्थ मिळू लागतात. जे फक्त चवीलाच चांगले लागत नाहीत तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरतात. 

बरेच लोक हिवाळ्यात खूप चहा आणि कॉफी पिण्यास सुरवात करतात. परंतु या ऋतूचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी, आपण हिवाळ्यातील काही खास खाद्यपदार्थ खावेत. ताज्या पालेभाज्यांपासून ते व्हिटॅमिन सी-पॅक केलेल्या संत्र्यांपर्यंत, तुमच्या प्लेटमध्ये काही गोष्टी असणे आवश्यक आहे.

जर तुम्ही विचार करत असाल की, हिवाळ्याच्या काळात आहारात कोणते पदार्थ समाविष्ट करावेत, तर अलीकडेच सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांनी इंस्टाग्रामवर हिवाळ्यात आहारात समावेश कराव्यात अशा ५ गोष्टी शेअर केल्या आहेत.

ऊसरुजुता दिवेकर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये शेअर केले की ऊस लीव्हरसाठी चांगले आहे. उसामुळे हिवाळ्यात त्वचा चमकदार ठेवतो. हिवाळ्यात उसाचा रस पिणे अत्यंत आरोग्यदायी आहे. उसाच्या रसामध्ये भरपूर फायबर असते, जे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करते. तसेच, ऊस शरीरातील चयापचय वाढवण्यास मदत करतो.

मनुकामनुका रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते.  हिवाळ्याच्या हंगामात अनेकदा आजारी पडणाऱ्या मुलांसाठी मनुका उत्तम आहे. तुम्ही तुमच्या स्नॅकमध्ये किंवा फ्रूट सॅलडमध्ये मनुका घालू शकता. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात जे त्वचेसाठी उत्तम असतात. अँटिऑक्सिडंट्स मुक्त रॅडिकल्सशी लढा देतात, पेशींचे नुकसान टाळतात. हे वृद्धत्वाचे परिणाम कमी करतात.

चिंचरुजुता दिवेकर सांगतात की चिंच ही एक उत्तम पाचक आहे, अगदी त्याच्या बिया ताकात मिसळूनही उत्तम पेय तयार होतं.

आवळाआवळा हिवाळ्याचा राजा आहे. आवळा संसर्गाशी लढण्यास मदत करतो. तो च्यवनप्राश, सरबत किंवा मुरांबा या स्वरूपात देखील खाता येते.

तीळ गुळतिळगुळ हिवाळ्यात भरपूर खाल्ला जातो, त्यात आवश्यक फॅट्स असतात. तिळगुळ हाडांसाठी आणि सांध्यासाठी खूप चांगला आहे.

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सHealthy Diet Planआहार योजना