समीधा दिसणार शेतकरीच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2016 04:05 IST2016-03-15T11:00:47+5:302016-03-15T04:05:59+5:30

मराठी इंडस्ट्रीची सुंदर अभिनेत्री समीधा गुरू ही मृणाल भोसले दिग्दर्शित कापूस कोंडयाची गोष्ट या चित्रपटात शेतकरीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

The role of farmer will be seen in Samedha | समीधा दिसणार शेतकरीच्या भूमिकेत

समीधा दिसणार शेतकरीच्या भूमिकेत

 
राठी इंडस्ट्रीची सुंदर अभिनेत्री समीधा गुरू ही मृणाल भोसले दिग्दर्शित कापूस कोंडयाची गोष्ट या चित्रपटात शेतकरीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट एक महिला शक्तीवर आधारित आहे. म्हणजेच थोडक्यात, तीन बहिणींचा ही गोष्ट असून या बहिणी घराचा आधारस्तंभ नसताना शेती करून आपलं आयुष्य कसं जगतात याची ही कहानी आहे. यामध्ये समीधा मोठया बहिणीच्या भूमिकेत आहे. या भूमिकेसाठी समीधाला राज्यस्तरीय पुरस्कार देखील मिळाला आहे. तसेच या चित्रपटाने अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बाजी मारली असून २०१४ चा दादासाहेब फाळके पुरस्कार देखील या चित्रपटाला प्राप्त झाला आहे. या चित्रपटात मकरंद अनासपुरे, समीधा गुरू प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. याव्यतिरिक्त भारत गणेशपुरे, गौरी कोंगे, मोहिनी कुलकर्णी, नेत्रा माळी या कलाकारांचा देखील या चित्रपटांमध्ये समावेश आहे.या चित्रपटाची कथा प्रसाद नामजोशी यांनी लिहीली आहे.याविषयी लोकमत सीएनएक्सशी बोलताना समीधा म्हणाली, या चित्रपटाच्या शुटिंगसाठी भर उन्हात शुटिंगसाठी स्वत: नांगर झुपले आहे. शेती करतानाचा एक छान अनुभव या चित्रपटाच्या माध्यमातून मिळाला आहे. अशा प्रकारच्या पुरस्कारांची यशाची पावती हातात असणारा हा चित्रपट १ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.



 

Web Title: The role of farmer will be seen in Samedha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.