लॉस्ट अॅण्ड फाउंड चित्रपटाचा मोशन टिझर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2016 15:36 IST2016-03-26T22:36:06+5:302016-03-26T15:36:06+5:30
तरूणांची धडकन असलेल्या या जोडीचा आगामी लॉस्ट अॅण्ड फाउंड या चित्रपटाची सध्या खूप चर्चा आहे.

लॉस्ट अॅण्ड फाउंड चित्रपटाचा मोशन टिझर रिलीज
म ाठी इंडस्ट्रीत आता, एक आगळी-वेगळी व हटके जोडी आपल्याला लॉस्ट अॅण्ड फाऊंड या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे.मराठी चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्री स्पृहा जोशी आणि हॅण्डसम बॉय सिद्धार्थ चांदेकर या दोघांनी ही आपल्या अभिनयाने तरूणांच्या मनावर आधिराज्य केले आहे. तरूणांची धडकन असलेल्या या जोडीचा आगामी लॉस्ट अॅण्ड फाउंड या चित्रपटाची सध्या खूप चर्चा आहे. आता, चाहत्यांच्या ही उत्सुकता पाहून नुक तेच लॉस्ट अॅण्ड फाऊंड या चित्रपटाचे मोशन टिझर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ऋतुराज धालगडे यांनी केले आहे. या चित्रपटाविषयी लोकमत सीएनएक्सशी बोलताना स्पृहा जोशी म्हणाली, पहिल्यांदा या टीमसोबत काम करित आहे. खूप छान टीम असून खूप मज्जा, मस्ती या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान केली आहे. औरंगाबादमध्ये या चित्रपटाचे पूर्ण शुटिंग झाले आहे. खरचं या चित्रपटाचा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय राहील.