सुरेख गाण्यासाठी आवाजाला आराम द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2016 02:04 IST2016-02-20T09:04:37+5:302016-02-20T02:04:37+5:30

 ‘लोकमत’ सखी मंच आयोजित ‘जल्लोष २०१६’ कार्यक्रमानिमित्त सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत जळगावात आल्या असता...

Relax the sound for a nice song | सुरेख गाण्यासाठी आवाजाला आराम द्या

सुरेख गाण्यासाठी आवाजाला आराम द्या

ोकमत’ सखी मंच आयोजित ‘जल्लोष २०१६’ कार्यक्रमानिमित्त सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत जळगावात आल्या असता, लोकमतच्या शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित सखी मंचच्या सदस्यांशी प्रश्नोत्तर स्वरूपात हसत खेळत मनसोक्त गप्पा मारत सुरेख आवाजासाठी आवाजाला आराम महत्त्वाचा आहे असा सल्ला दिला. 

त्यांनी आपल्या गायनातील आवडी निवडी बरोबरच आपल्या कौटुंबीक सुखाचे गुपीत सांगून सखींना कानमंत्र दिला. यावेळी ‘लोकमत’चे वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रविण चोपडा, संपादकीय प्रमुख मिलिंद कुलकर्णी, विनित जोशी व मिलिंद जैन आदी मान्यवर उपस्थित होते.  

सखींच्या प्रश्नांना वैशाली सामंत यांनी दिलेले मनसोक्त उत्तरे- 
प्रश्न- गायन सुंदर होण्यासाठी आपण रोज किती वेळ सराव करतात? 
वैशाली- आपण महिला रोज स्वयंपाक बनवितो, मात्र रोजच सराव करीत नाही. माझी गायनाची कला मी आत्मसात केली आहे. त्यामुळे रोजच सरावाची गरज नाही. मात्र कार्यक्रम असेल तर थोडा सराव करून जाते. आणि चांगल्या गायनासाठी जेवण, सराव व आराम महत्त्वाचा आहे. या तीघांचा समतोल साधला गेला पाहीजे.    
प्रश्न- आपण जेवण चांगले बनवत असाल?  
वैशाली- मी शुद्ध शाकाहारी असून एक चांगली गृहिणीदेखील आहे. यामुळे मला कुटुंबियांसोबत राहून त्यांच्यासाठी चांगले जेवण करणे आवडते.   
प्रश्न- गायना व्यतिरिक्त आपला दुसरा छंद कोणता आहे? 
वैशाली- वाचन करायला आवडते. मात्र व्यवसायाच्या व्यापामुळे वाचनाला सध्या कमी वेळ मिळतो. तसेच चांगले चित्रपट बघायला आवडते व बाजारात भाजी खरेदी करायला देखील आवडते.  
प्रश्न- आपल्या यशाचे श्रेय कोणाला द्याल? 
वैशाली- माझ्या यशाचे श्रेय मी माझ्या आई वडिल तसेच गुरू पंडित मनोहर यांना देईल.    
प्रश्न- पहिले गाणे गायल्यावर काय वाटले? 
वैशाली- पहिल्या गाण्याचा अनुभव वेगळाच होता,  थोडी भितीही होती. मात्र गाणे गायल्यावर मिळालेल्या प्रतिसादाने मन भारावून गेले स्वत:च्या आवाजाला न्याय देऊ शकते असे वाटले. 
प्रश्न- गाणे गाण्यासाठीची उर्जा कशी प्राप्त करतात?
वैशाली- योगा व ध्यान साधनाने उर्जा टिकवून ठेवते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे मी जेवणाशिवाय गाणे गाऊ शकत नाही, म्हणून माझ्या साठी जेवणही तेवढेच महत्त्वाचे आहे. 
प्रश्न- आपल्या जीवनातील एखादा विनोदी किस्सा सांगा?
वैशाली- माझ्या विसराळूपणामुळे बºयाचदा विनोदी किस्से घडले आहेत. एकदा गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी एका स्टुडिओत जायायचे होते, मात्र तिथे जायायचेच विसरले. कधी कधी भाजीपाला खरेदी करताना पैसे तर देते मात्र घेतलेली भाजीच तिथे विसरते. 
प्रश्न- बेटी बचाओ, बेटी पढाओ बाबत काय सांगु शकाल? 
वैशाली- हे अभियान राबविणेच मुळात खंताची बाब आहे. चुकीच्या समजूतीमुळे स्त्री भृण हत्या केली जाते. आज मुली कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. तरीही आाज मुलगा-मुलगी भेदभाव दिसुन येतो ही दुर्देवाची गोष्ट आहे. घराचे व्यवस्थापन स्त्रीच चांगल्या प्रकारे करू शकते. आणि वृद्धापकाळात मुला पेक्षा मुलगी चांगली काळगी घेऊ शकते. 
प्रश्न- कोणते गाणे गायायला मजा आली?
वैशाली- ऐका दाजिबावर जास्त मेहनत घेतली आहे, त्यामुळे कोंबडी पळाली पेक्षा ते गाणे गायायला जास्त मजा येते. 
प्रश्न- गळा चांगला राहावा म्हणून काय काळजी घ्यावी?
वैशाली- अनेक गायक यासाठी खाण्या पिण्याचे पथ्य पाळतात, मात्र मला खाण्याची जास्त आवड असल्याने मी आईस्क्रीम, समोसे, वडे, पाणीपूरी आदी खात असते, मात्र बर्फाचे पाणी टाळते.  

Web Title: Relax the sound for a nice song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.