लेट स्टेजमध्ये असणाऱ्या कॅन्सर रुग्णांच्या संख्येत ७५% पर्यंत घट; उपचारांचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 13:40 IST2025-11-08T13:38:17+5:302025-11-08T13:40:54+5:30
कॅन्सरचे लवकर निदान झाल्याने रुग्ण वाचवता येऊ शकतो

लेट स्टेजमध्ये असणाऱ्या कॅन्सर रुग्णांच्या संख्येत ७५% पर्यंत घट; उपचारांचा परिणाम
जयपूर : कॅन्सरच्या रुग्णांची संख्या जरी वाढली असली, तरी या आजाराविषयीची जागरूकता आणि लवकर निदानामुळे लेट स्टेज म्हणजेच आजाराच्या अंतिम टप्प्यात पोहोचणाऱ्या रुग्णांची संख्या ७५ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. कॅन्सरचे लवकर निदान झाल्याने रुग्ण वाचवता येऊ शकतो, हे सरकारच्या उपाययोजना व रुग्णाने घेतलेले तत्पर उपचार यांचे यश असते. एसएमएस मेडिकल कॉलेजच्या स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूटमधील सर्जिकल ऑन्कॉलॉजी विभागाने यासंदर्भातील आकडेवारी दिली आहे. यात आधुनिक औषधांनी उपचारही लवकर केले जाऊ शकतात, असे म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
रुग्णांच्या बरे होण्याच्या प्रमाणात वाढ
कॅन्सर तज्ज्ञांनी सांगितले की, कॅन्सर झाल्याच्या प्रारंभीच्या काळातच अनेक रुग्ण उपचारांसाठी येत असून त्यामुळे ते बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. मागील पाच वर्षांत लेट स्टेज रुग्णांचे प्रमाण ७५ टक्क्यांपर्यंत घटले आहे.
एसएमएस मेडिकल कॉलेजच्या स्टेट कॅन्सर इन्स्टिट्युटमधील स्थिती
- ८०,००० पेक्षा अधिक रुग्ण कॅन्सर निदान, उपचारांसाठी ओपीडीमध्ये पोहोचले.
- ३५,००० पेक्षा अधिक जण आयपीडी रुग्ण असून त्यातील बहुतांश नवे आहेत.
- २,५०० पेक्षा जास्त रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. दर महिन्याला १ किंवा २ रुग्णांचा मृत्यू होतो
कार्यकर्त्यांना विशेष प्रशिक्षण
राजस्थान सरकार व केंद्र सरकारतर्फे गावागावांत कॅन्सर स्क्रीनिंग मोहीम राबवली जात आहे. यात स्तन, गर्भाशयमुख व अन्य कॅन्सरच्या तपासण्या विनामूल्य केल्या जातात. अशा तपासणीकेंद्रांमुळे कॅन्सरची प्रारंभिक लक्षणे असलेल्या रुग्णांना त्वरित उपचार मिळू शकतात. आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि स्वयंसेवकांना यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.