शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

उचकी लागली... कोणी आठवण काढतंय का? नाही, 'ही' आहेत कारणं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 15:20 IST

एकदा दोनदा उचकी लागली तर काही वाटतं नाही मात्र उचक्या जर सारख्या येत असतील तर ते नकोस वाटतं. पण तुम्हाला माहिती आहे का उचकी येण्यामागे नेमकं कारण काय आहे. आणि उचकी येण्याचे काय संकेत आहेत.

जेव्हा आपल्याला उचकी लागते तेव्हा कोणीतरी आपली आठवण काढतंय असं म्हटलं जातं. एकदा दोनदा उचकी लागली तर काही वाटतं नाही मात्र उचक्या जर सारख्या येत असतील तर ते नकोस वाटतं. पण तुम्हाला माहिती आहे का उचकी येण्यामागे नेमकं कारण काय आहे. आणि उचकी येण्याचे काय संकेत आहेत.

उचकी का लागते?उचकी तुमच्या शरीरातील डायाफ्राम नावाच्या भागातून येण्यास सुरुवात होते. हा डायफ्राम म्हणजे फुफ्फुस आणि पोटा दरम्यानचे स्नायू असतात. साधारणपणे, जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा डायाफ्राम खालच्या बाजूस खेचला जातो. तर श्वास सोडल्यानंतर, तो पुन्हा पूर्वस्थितीत येतो. डायाफ्राम त्याचे कार्य एका विशिष्ट पद्धतीने करतं. परंतु जेव्हा त्याला कोणतीही समस्या जाणवते तेव्हा बदल होतो. यामुळे, हवा अचानक घशात थांबते, ज्यामुळे आवाज बाहेर पडण्यास समस्या येते. व्होकल कॉर्डमध्ये हे अचानक आलेल्या अडथळ्याने एक 'हिच' असा आवाज येतो.

उचकी या कारणांमुळे येऊ शकते...उचकी येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. यामध्ये काही शारीरिक आणि काही मानसिक आहेत. जास्त आणि खूप लवकर खाल्ल्यानेही उचकी येऊ शकते. खूप चिंताग्रस्त किंवा उत्साही असणं, कार्बोनेटेड पेयं किंवा जास्त अल्कोहोल पिणं देखील उचकीचं कारण ठरू शकतं. तणाव, तापमानात अचानक बदल किंवा कँडी-च्युइंग गम चघळताना तोंडात हवा भरल्यामुळेही उचकी येऊ शकते.

दीर्घकाळ राहणारी उचकीसहसा उचकी फक्त थोड्या काळासाठी येते आणि आपोआप जाते. परंतु काहीवेळा उचकी जाण्याचं नावंच घेत नाही. हे डायाफ्रामला जोडलेल्या नसाचं काही प्रमाणात नुकसान झाल्यामुळे होऊ शकतं. कानाच्या तसंच घशाचा समस्या डायाफ्रामच्या नसांवर परिणाम करतात.

उचकी कशी थांबवावी?उचकी थांबवण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत, पण काही तज्ज्ञांचा म्हणण्याप्रमाणे काही वेळ श्वास रोखून ठेवल्याने उचकीपासून आराम मिळू शकतो. या व्यतिरिक्त, कागदी पिशवीत श्वास घेणं देखील एक पर्याय आहे. यामध्ये हे दोन्ही फुफ्फुसांमध्ये कार्बन डाय ऑक्साईड तयार करतात परिणामी डायाफ्रामला आराम मिळतो.

कधी करावा डॉक्टरांचा संपर्क?जर तुम्हाला २ दिवसांपेक्षा जास्त काळ उचकीच्या त्रास होत असेल. तसेच त्यासोबत तुम्हाला उचकीमुळे खाणं, श्वास घेणं तसंच झोपताना त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधावा. या व्यतिरिक्त, जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची पोटदुखी, ताप, श्वास लागणं, उलट्या होणं किंवा खोकला असेल तर ताबडतोब तुमच्या डॉक्टरांना त्याबद्दल सांगा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स