अर्ध्या रात्री अचानक तहान लागते? जाणून घ्या याचं कारण आणि यावर उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 09:43 AM2023-11-28T09:43:58+5:302023-11-28T09:44:22+5:30

Thirst At Mid Night Main Reason: आजकाल ही समस्या फार कॉमन झाली आहे. अशात तुम्हीही सतर्क राहणं गरजेचं असतं. चला जाणून घेऊ यामागचं कारण काय आहे.

Reason for thirst at mid night | अर्ध्या रात्री अचानक तहान लागते? जाणून घ्या याचं कारण आणि यावर उपाय

अर्ध्या रात्री अचानक तहान लागते? जाणून घ्या याचं कारण आणि यावर उपाय

Thirst At Mid Night Main Reason: रात्रीची झोप सगळ्यांनाच प्रिय असते. त्यात काहीही खोळंबा आला तर चिडचिड होते. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी सामान्यपणे 7 ते 8 तासांची झोप घ्यावी लागते. पण अनेक अर्ध्या रात्री तहान लागते, ज्यामुळे झोपमोड होते. घाम येतो आणि घसाही कोरडा पडतो. आजकाल ही समस्या फार कॉमन झाली आहे. अशात तुम्हीही सतर्क राहणं गरजेचं असतं. चला जाणून घेऊ यामागचं कारण काय आहे.

दिवसभर कमी पाणी पिणं

एक्सपर्ट नेहमीच सांगतात की, एका निरोगी आणि फीट व्यक्तीने रोज 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. जर तुम्ही दिवसभर कमी पाणी प्याल तर शरीर रात्री इशारा देऊ लागतं की, शरीरात पाणी कमी झालं आहे. यामुळेच नियमित अंतराने पाणी पित रहावं.

चहा-कॉफीचं सेवन

भारतात चहा आणि कॉफीचं सेवन भरपूर केलं जातं. पण यामुळे आरोग्याला फार नुकसान होतं. या पेय पदार्थांमध्ये कॅफीनचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे शरीरात वॉटर कंटेंट कमी होऊ लागतं. अशात रात्री समस्या होऊ लागते. कॅफीनमुळे पुन्हा पुन्हा लघवी येते. ज्यामुळे शरीरातील पाणी कमी होतं.

जास्त चटपटीत खाणं

निरोगी राहण्यासाठी दिवसभर केवळ 5 ग्रॅम मीठच खाल्लं पाहिजे. जर यापेक्षा जास्त मिठाचं सेवन केलं तर शरीरावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो. मिठात सोडिअम जास्त असतं जे डिहायड्रेशनचं कारण बनू शकतं. याच कारणाने रात्री तहान लागते.

घसा कोरडा पडू नये म्हणून काय करावे

अर्ध्या रात्री तहान लागू नये आणि झोपमोड होऊ नये असं वाटत असेल तर काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. 

- दिवसभर भरपूर पाणी प्यावे.

- चहा-कॉफीचं सेवन बंद करा किंवा कमी प्रमाणात करा.

- सोडा ड्रिंक्समध्ये कॅफीन असतं, याचं सेवन टाळावं.

- लिंबू पाणी, छास, फ्रूट जूस प्या

- चटपटीत, तळलेले पदार्थ खाऊ नका

- मसालेदार पदार्थ खाल्ल्याने तहान वाढते, ते टाळावे.

Web Title: Reason for thirst at mid night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.