शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
6
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
7
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
8
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
9
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
10
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
11
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
12
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
13
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
14
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
15
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
17
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

कच्ची पपई तुम्ही कल्पनाही करु शकत नाही इतकी फायदेशीर, मात्र महिलांनी 'असा' करावा उपयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 16:58 IST

कच्ची पपई शरीरातील वाढलेलं युरिक अ‍ॅसिड (Control Measures for Uric Acid) नियंत्रणात ठेवण्यास उपयोगी आहे.

आपल्या आहारात फळांचा समावेश असणं फायदेशीर ठरतं. फळांमध्ये असणारी जीवनसत्त्वं, पोषकद्रव्यं (Nutritional Content) ही केवळ शरीरातली रोगप्रतिकारकशक्तीच (Immune Power) वाढवत नाहीत, तर शरीरात उर्जा वाढवण्याचं ही काम करतात. पथ्य पालन (Diet Conscious) करणार्‍या लोकांना अनेकवळा फलाहार करण्याचा सल्ला दिला जातो. वजन वाढलं असल्यास कमी करण्यासाठी(Weight Loss) केवळ व्यायाम, योग नाही तर उत्तम आहारदेखील तितकाच महत्त्वाचा ठरतो. म्हणूनच कच्ची पपई शरीरातील वाढलेलं युरिक अ‍ॅसिड (Control Measures for Uric Acid) नियंत्रणात ठेवण्यास उपयोगी आहे.

शरीरातील वाढतं युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी कोणत्याही औषधापेक्षा कच्ची पपई हा रामबाण उपाय ठरतो. हा नैसर्गिक उपाय असल्याने कच्ची पपई खाल्ल्याने कुठलेच साईड इफेक्ट्स(Side Effects of Medicines) होत नाहीत. पण  कच्ची पपई कशी खायची आणि त्याबद्दलची नीट माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. या बाबतचं वृत्त डीएनए ने दिलं आहे.

शरीरात युरिक अ‍ॅसिड वाढल्याने विविध आजारांना आणि दुखण्यांना सामोरं जावं लागतं. संधिवात म्हणजेच अर्थरायटिस (Remedies for Arthritis) सारखं गंभीर दुखणं कोणत्याही वयात होऊ शकतं. यासाठीच युरिक अ‍ॅसिड आणि इतर अ‍ॅसिडयुक्त पदार्थांचं शरीरातील वाढणारं प्रमाण नियंत्रणात राखणं गरजेचं आहे. संधिवात हा आजार बहुतांशपणे ज्येष्ठ लोकांच्या(Common Diseases for Senior Citizens) बाबतीत दिसून येणारा आजार आहे. या आजाराची लागण होऊ नये यासाठी आहारात कच्च्या पपईचा वापर अनिवार्य ठरतो. संधिवात झालेल्या व्यक्तींना उठणं, बसणं, फिरणं या साध्या हालचाली करताना अत्यंतिक वेदना होतात.

शरीसाठी आवश्यक अँटिऑक्सिडंटचं आणि खनिजांचं, जीवनसत्त्वांचं प्रमाण कच्च्या पपईत भरपूर प्रमाणात आढळून येतं. कच्च्या पपईत कॅलरीजचं (Calories in Papaya) प्रमाणही अतिशय कमी असतं तर व्हिटॅमिन सी, फोलेट अर्थात व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन ई यांचं प्रमाण मुबलक असतं. या तीन व्हिटॅमिन्समुळे (Vitamins for Health) शरीरातील युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात राहतं, पर्यायाने संधिवाताच्या पेशंट्सच्या तब्येतीला आराम पडतो. असा ही गुणकारी पपई कशी खायची याचे नियम आहेत.

शरीरातील युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात राहण्यासाठी दररोज सकाळी कच्च्या पपईचा ज्युस घेणं गुणकारी आहे. या ज्युसमध्ये लिंबू किंवा मध घालून सेवन केल्यास तो शरीराला विपुल प्रमाणात आवश्यक ते पोषक घटक देतो. हा ज्युस सकाळी उठल्यावर अनुशापोटी घेतल्यास निश्चितच खूप फायदा होतो. इतकंच नाही तर वजन घटवण्यासाठी ही कच्ची पपई वरदानच ठरते. यासोबतच दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात कच्च्या पपईच्या भाजीचा नियमितपणे समावेश केल्यास तब्येतीसाठी गुणकारी ठरतं. फक्त कच्च्या पपईच्या भाजीला थोडीशी मेथी आणि हिंग यांची फोडणी देऊन हळद आणि मीठ घालून शिजवून घ्यावी. म्हणूनच शरीरात युरिक अ‍ॅसिडचं प्रमाण वाढल्यास अँन्टिबायोटिक्स(Effects of Antibiotics on Human Body) घेण्याऐवजी नैसर्गिक अशा कच्च्या पपयांचा आहारातला समावेश विविध आजारांना रोखतोच, पण तब्येतही तंदुरूस्त ठेवतो.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स