शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एका वर्षात उपचारासाठी येतो २ कोटी ७५ लाख रूपये खर्च, कोट्यावधींमधून एकाला होतो हा दुर्मीळ आजार....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 14:30 IST

Rare Pompe disease : धक्कादायक बाब म्हणजे ललितचा मोठा भाऊ हा सुद्धा पोम्पे रोगाने ग्रस्त होता. आणि एक वर्षाआधीच त्याचा या गंभीर आजाराने मृत्यू झाला.

Rare Pompe disease : असं म्हणतात की, सर्वात मोठं सुख हे निरोगी राहणं हेच आहे. याचा अर्थ राजस्थानच्या बाडमेर(Barmer) जिल्ह्यात राहणाऱ्या ललित सोनीपेक्षा जास्त चांगला कुणीही समजू शकत नाही. कारण ललित ज्या आजाराने ग्रस्त आहे तो कोट्यावधी लोकांमधून एक किंवा दोघालाच होतो. या आजाराचं नाव आहे पोम्पे(Rare Pompe disease). हा आजार इतका गंभीर आहे की, याच्या उपचारासाठी वर्षाला २ कोटी ७५ लाख रूपये इतका खर्च येतो.

धक्कादायक बाब म्हणजे ललितचा मोठा भाऊ हा सुद्धा पोम्पे रोगाने ग्रस्त होता. आणि एक वर्षाआधीच त्याचा या गंभीर आजाराने मृत्यू झाला. आता ललित आपल्या-आई वडिलांचा एकुलता एक आधार आहे. तोही या आजाराने ग्रस्त आहे.सोशल मीडियावर बाडमेरचे लोक ललितला वाचवण्यासाठी देशाच्या पंतप्रधानापासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांना हाक देत आहेत. सरकारने समोर येऊन ललितला दुर्मीळ आजारातून वाचवलं पाहिजे. या उपचारासाठी जे इंजेक्शन अमेरिकेहून येतं त्याचा वार्षिक खर्च २ कोटी ७५ लाख येतो. त्याला हा खर्च दिला पाहिजे.

ललितच्या परिवाराकडे जो पैसा होता तो त्यांनी आधी मोठ्या मुलाच्या उपचारावर आणि आता ललित उपचारावर खर्च केला. ललितचे वडील चंपालाल एका खाजगी कंपनीत काम करतात. ते म्हणाले की, मोठ्या मुलालाही हाच आजार होता. त्यात ८ ते १० वर्षे निघून गेले. त्याचा गेल्यावर्षी मृत्यू झाला.

ललितच्या वडिलांनी सांगितले की, ललितच्या शरीरात हा आजार दिवसेंदिवस पसरत आहे. याचा एकमेव उपचार अमेरिकेहून लसी आणणं हाच आहे. मी पंतप्रधानांपासून ते सर्व नेत्यांना मदतीची मागणी केली आहे. माझा एक मुलगा आम्ही गमावला आहे. आता आमचा अखेरचा आधार शिल्लक आहे. सरकार त्याला वाचवू शकते.

डॉक्टर महेंद्र चौधरी यांनी सांगितले की, ग्लायकोजन स्टोरेज डिसऑर्डर २ म्हणजे पोम्पे आजार आहे. हा आजार कोट्यावधी लोकांमधून एकाला होतो. पोम्पे आजारात शरीरातील सेल्समद्ये ग्लायकोजन नावाचा कॉम्प्लेक्स शुगर एकत्रित होतो. शरीर या प्रोटीनचं निर्माण करू शकत नाही. याचा एकमेव उपाय म्हणजे एंजाइम थेरपी आहे. ज्यासाठी एका वर्षात २६ इंजेक्शन लागतात. 

ललितचे मामा नरेश यांनी सांगितले की, ६ महिन्यांआधी जेव्हा टेस्ट केली तेव्हा समजलं की, ललितला सुद्धा तोच आजार आहे जो त्याच्या मोठ्या भावाला होता. यात २४ तासांपैकी १६ तास रूग्णाला ऑक्सीजनवर ठेवावं लागतं. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानHealthआरोग्य