शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

'या' फळामुळे पसरतोय निपाह व्हायरस? लिचीसारखं दिसणारं हे फळ आणि वटवाघळं याआधीही चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 17:54 IST

तुम्हाला माहित आहे का? की निपाह व्हायरसचा फैलाव होण्यासाठी एक फळं कारणीभूत असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. लिचीसारखं दिसणारं हे फळं सध्या चर्चेचा विषय ठरलंय.

निपाह व्हायरसचा (Nipah Virus) धोका वाढू लागला आहे. केरळमध्ये याचे रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली. पण तुम्हाला माहित आहे का? की निपाह व्हायरसचा फैलाव होण्यासाठी एक फळं कारणीभूत असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. लिचीसारखं दिसणारं हे फळं सध्या चर्चेचा विषय ठरलंय.  निपाह व्हायरसचा संसर्ग फैलावण्याशी या फळाचा संबंध असू शकतो, असं मानलं जात आहे. हे फळ ज्या ज्या मुलांनी खाल्लं होतं, त्या सगळ्या मुलांना निपाह व्हायरसचा संसर्ग झाला. त्यातल्या एका मुलाचा मृत्यूही झाला. 

दक्षिण आशियाई देशांमध्ये हे फळ मोठ्या प्रमाणावर आढळतं. त्याची चव लिचीसारखी (Litchi) असते. हे फळ आरोग्यासाठी लाभदायक असल्याचं आतापर्यंत मानलं जात होतं. त्यामुळे काही त्रासही होतात; मात्र विषाणूचा प्रसार करणारं फळ अशी त्याची कधीच ओळख नव्हती. त्यामुळे निपाह व्हायरस या फळामुळे पसरला अशी जी चर्चा सध्या सुरू आहे, त्यात कदाचित असंही झालेलं असू शकतं, की वटवाघळांनी ते फळ खाल्लेलं असल्यामुळे त्या फळांच्या माध्यमातून विषाणूचा प्रसार झाला असावा. गेल्या वेळीही जेव्हा केरळमध्ये निपाह व्हायरसचा फैलाव झाला होता, तेव्हा हे फळ आणि वटवाघळं (Bat) या दोन्हीही गोष्टी चर्चेत आल्या होत्या.

या फळाचं नाव आहे  रामबूतान फळ (Rambutan fruit). या फळाला लाल रंगाचं केसांसारखं कवच असतं. त्याच्या आत लिचीसारखा गोड गर असतो. या फळाच्या झाडावर वटवाघळांचं वास्तव्य असतं.

रामबूतान आरोग्यासाठी फायदेशीरया फळात अनेक औषधी गुणधर्म असतात. त्यात प्रोटीन्स, फायबर्स, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, झिंक, कॉपर, रायबोफ्लेव्हिन, मँगनिज, नियासिन असे अनेक पौषक घटक असतात. फायटोकेमिकल्समुळे हे फळ अँटीडायबेटिक, अँटी अ‍ॅलर्जिक आणि अँटी मायक्रोबियल म्हणूनही ओळखलं जातं. हे फळ आहारात असेल, तर अनेक विकारांपासून बचाव होऊ शकतो.

हे फळ शरीरातली ऊर्जेची पातळी (Energy) वाढवतं. त्यात कॅलरी आणि कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असतं. त्यात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन एदेखील काही प्रमाणात असतं. त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास हातभार लागतो.

रामबूतान फळ आहारात असेल, तर पचनक्रियाही चांगली राहते. गॅस, अपचन आदी तक्रारी नाहीशा होतात. सौंदर्यवृद्धीसाठीही हे फळ काम करतं. हे फळ आहारात असेल, तर केस मजबूत होतात, त्यांना चमक येते आणि त्यांची वाढही चांगली होते.

रामबूतानचे शरीराला होणारे तोटेरामबूतान फळात पोटॅशियम असल्यामुळे हे फळ जास्त प्रमाणात खाल्लं गेलं, तर उलट्या आणि डायरिया होऊ शकतो. या फळाच्या सालींच्या अर्काचं सेवन जास्त प्रमाणात केलं गेलं, तर शरीरातली Toxic Level वाढू शकते. व्हिटॅमिन सी असल्यामुळे हे फळ जास्त प्रमाणात खाल्लं तर पोट बिघडू शकतं. एखाद्या व्यक्तीला वेगळं काही खाल्ल्यानंतर अ‍ॅलर्जी होत असेल, तर या फळाचीही अ‍ॅलर्जी येऊ शकते.

लिची आणि रामबूतानमधला फरकलिचीची फळं रामबूतानपेक्षा थोडी लहान आकाराची असतात. लिचीदेखील (Litchi) लाल रंगाचीच असते; मात्र लिचीच्या फळांची सालं जास्त खरखरीत असतात. लिचीचा गरही रामबूतानप्रमाणेच पांढऱ्या रंगाचा असतो; मात्र त्याचा स्वाद वेगळा असतो. दोन्हींच्या गरामध्ये मोठी बी असते. लिचीच्या साली जास्त जाड असत नाहीत. त्यामुळे साल सहजपणे वेगळं करता येऊ शकतं.

रामबूतान आणि वटवाघळांमधला संबंधरामबुतानची झाडं जास्त असतात, तिथे वटवाघळं जास्त असतात, असं आढळतं. त्यांचं त्या झाडांवर वास्तव्य असतं. या फळांवरही ती बसतात. वटवाघळांमध्ये अनेक प्रकारचे विषाणू आढळतात. त्यांचा या फळांशी संपर्क आल्यामुळे काही फळं संसर्गाची वाहक होण्याची शक्यता असते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सNipah Virusनिपाह विषाणूNipah virusनिपाह व्हायरसfruitsफळे