निर्मात्यांनी प्रोफेशनल वागण्याची गरज- अनिकेत विश्वासराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 01:06 IST2016-03-10T08:06:10+5:302016-03-10T01:06:10+5:30

   पोस्टर बॉईज, पोस्टर गर्ल, फक्त लढ म्हणा , आंधळी कोशिंबीर, नो एन्ट्री पुढे धोका आहे, यासारख्या चित्रपटांतून दर्जेदार अभिनय साकारून अनिकेत विश्वासरावने मराठी चित्रपटसृष्टीत कमी वेळात स्वत:चे अस्तित्व निर्माण केले.

Producers need professional treatment - Aniket Vishwasrao | निर्मात्यांनी प्रोफेशनल वागण्याची गरज- अनिकेत विश्वासराव

निर्मात्यांनी प्रोफेशनल वागण्याची गरज- अनिकेत विश्वासराव


/>           पोस्टर बॉईज, पोस्टर गर्ल, फक्त लढ म्हणा , आंधळी कोशिंबीर, नो एन्ट्री पुढे धोका आहे, यासारख्या चित्रपटांतून दर्जेदार अभिनय साकारून अनिकेत विश्वासरावने मराठी चित्रपटसृष्टीत कमी वेळात स्वत:चे अस्तित्व निर्माण केले. सुधिर मिश्रा यांच्या चमेली या चित्रपटातून डेब्यु करणाºया या अभिनेत्याने  पाहता पाहता रसिक प्रेक्षकांच्या मनावर त्याच्या अभिनयाची मोहोर उमटविली. 
तरूणींच्या गळ््यातील ताईत बनलेला चॉकलेट बॉय  म्हणजेच अनिकेत विश्वासराव मराठी इंडस्ट्रीमध्ये काय बदल घडायला हवेत  यावर सेलिब्रीटी  रिर्पोटरच्या माध्यमातून  संवाद साधत आहेत.

                                       
          आजकाल निर्माते केवळ हौस म्हणून चित्रपट बनवित आहेत. ही अत्यंत चुकिची बाब आहे. चित्रपटांमध्ये वेगवेगळे चांगले विषय येण्याची गरज आहे. त्यामुळे फक्त आवड म्हणून चित्रपट काढणे आणि  त्याच दृष्टीने सिनेमाकडे पाहण्याचा दृष्टीकोन निर्मात्यांनी बदलायला पाहिजे. चित्रपटाकडे केवळ मनी मेकिंग बिझनेस म्हणून न पाहता प्रोफेशनली पाहायला पाहिजे.
कोणताही सिनेमा चांगला दर्जेदार असणे गरजेचे असते. चांगल्या चित्रपटांना सपोर्ट करण्याची गरज आहे. पोस्टर गर्लचा विषय चांगला होता. तो चांगल्या प्रकारे प्रेक्षकांच्या समोर प्रेझेंट झाला म्हणून प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे सिनेमाच्या बजेट पेक्षा सिनेमाची कुवत पाहिली पाहिजे. आज कट्यार, नटसम्राट हे चित्रपट प्रेक्षकांनी पाहिले आहेत त्यामूळे अशा सिनेमांना नक्कीच  अ‍ॅप्रिशिएट करायला पाहिजेत
कलाकार चित्रपटांमध्ये काम करताना अतिशय मेहनत घेतात. जीव ओतून अभिनय करतात. परंतू काही वेळेस असे होते की, प्रोड्यूसर अचानक दोन - तीन वर्षात तो सिनेमा रिलिज करतात. अश्या प्रकारचे अनेक चित्रपट चित्रपटगृहांमध्ये लागतात आणि जातात. त्याचा फारसा इम्पॅक्ट राहत नाहीत. त्यामूळे निर्मात्यांनी प्रत्येक चित्रपट हा माझा सिनेमा म्हणूनच पाहिला पाहिजे. त्यांनी प्रोफेशनल अ‍ॅप्रोच ठेवला पाहिजे. 

                              
    चित्रपटाची निमीर्ती करताना त्यामागे असंख्य जणांचे हात लागले असतात. त्यामुळे तो चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी सर्व गोष्टींचे योग्य रितीने प्लॅनिंग करण्याची आवश्यकता असते. सध्या सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे चित्रपटाचे प्रमोशन. निर्मात्यांनी योग्य रितीने सर्व माध्यमांमध्ये चित्रपटाचे प्रमोशन केले तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. त्यासाठी स्ट्रॅटॅजी प्लॅन करण्याची आवश्यकता असते. कलाकार चित्रपटाच्या प्रमोशनसाठी देखील वेळ देतात परंतू वेळेत प्रमोशन सुरू झाले नाही तर कलाकारांच्या पुढील सिनेमाच्या तारखा त्यावेळी क्लॅश होतात. त्यावेळी कलाकारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. 
बॉलीवूड कडून मराठी चित्रपटसृष्टीने कामाचे  नियोजन  कसे करायचे हे शिकले पाहिजे. निर्मात्यांनी   चित्रपटांना ३०-४० लाख रूपये अनुदान मिळते म्हणून  सिनेमा बनवणे  हे कितपत योग्य आहे याचा विचार करणे गरजेचे आहे. निर्मात्यांनी पैसा खर्च केला तर नक्कीच चांगला चित्रपट बनू शकेल. ६० ते ८० लाख रूपयांमध्ये आता चित्रपट बनत नाहीत. जास्त पैसा खर्च न करणाºया निर्मात्यांनी रिटन येणाºया पैशांची अपेक्षा करू नये.  खरेदी करताना  जो प्रोडक्ट चांगला आहे प्रोडक्ट आपण खरेदी करतो. त्याचप्रमाणे एखाद्या कलाकाराला चांगलेच काम करावे लागते. आपले प्रेक्षक हे सुजाण आहेत. त्यांना आपण गंडवू शकत नाहीत. 

Web Title: Producers need professional treatment - Aniket Vishwasrao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.